agriculture news in Marathi, paisevary of rabi in Kharip, Maharashtra | Agrowon

नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप हंगामात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. यामुळे पैसेवारीही हंगामानुसार काढण्यात येतात. परंतु नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामातच रब्बी हंगामाची पैसेवारी काढण्यात आली आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात. यामुळे पैसेवारीही हंगामानुसार काढण्यात येतात. परंतु नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामातच रब्बी हंगामाची पैसेवारी काढण्यात आली आहे. प्रशासनाच्या या अजब कारभारावर आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

खरीप हंगामात येणारी पिके रब्बी हंगामात येत नाही. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. नागपूर जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी हीच दोन पिके घेतात. चार लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रात ही दोन पिके घेतली जातात. खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी डिसेंबर महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीच्या आधारे पीक परिस्थितीचा अंदाज लावण्यात येते. ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना दुष्काळ सदृश गावे म्हणून जाहीर करण्यात येते. त्यांना शासनाकडून काही सवलतीही देण्यात येते.  

वीजबिलात ३३ टक्के सवलत, शेतसारा माफ, परीक्षा शुल्क माफच्या सवलती आहेत. यंदा खरीप हंगामात कमी पावसामुळे केंद्र शासनाकडून राज्यातील १५१ तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. तर राज्य शासनाकडून २६८ महसूल मंडळ दुष्काळी जाहीर करण्यात आले. यात नागपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश आहे. 

खरीप हंगामात पैसेवारी ५० पेक्षा जास्त दाखविण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याच खरीप हंगामात रब्बीचा हंगामाचीही पैसेवारी काढण्यात आली आणि सर्व गांवामध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली. रब्बीचा हंगाम खरीप नंतर असतो. असे असतानाही खरीप हंगामात रब्बी हंगामाच्या पिकांची पैसेवारी प्रशासनाकडून काढण्याचा प्रताप महसूल प्रशासनाने केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...