agriculture news in marathi Paisewari More than fifty percent in Ratnagiri District | Page 2 ||| Agrowon

रत्नागिरीतील १५०३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 नोव्हेंबर 2021

खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील ३१ ऑक्टोबरपर्यंतची सुधारित हंगाम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण १ हजार ५३८ गावांपैकी १ हजार ५०३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे.

रत्नागिरी : खरीप हंगामात भातपीक घेणाऱ्या गावातील ३१ ऑक्टोबरपर्यंतची सुधारित हंगाम पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात एकूण १ हजार ५३८ गावांपैकी १ हजार ५०३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे. ३५ गावांमध्ये भातपीक घेतले जात नसल्याने त्या गावांची पैसेवारी जाहीर केलेली नाही.

पीक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून शेतकऱ्याला मिळणारे विविध प्रकारचे साह्य हे पीक पैसेवारीवरच अवलंबून असते. मागील दहा वर्षांच्या कालावधीत तीन उत्तम उत्पन्नाची सरासरी हे त्या शेतकऱ्याचे उत्पन्न समजले जाते. कृषी विभागाकडून काढलेल्या या उत्पन्नाचे मूल्यांकन १०० पैसे समजले जाते. पाहणी केलेल्या हेक्टरी उत्पादन आणि प्रमाण उत्पादन याच्या आधारावर ही पैसेवारी काढण्यात येते.

ज्या गावातील पैसेवारी ५० पैसे किंवा त्याहून कमी असेल, तर त्या गावातील जमीन महसुलात सूट देण्यात येते. असे क्षेत्र टंचाईग्रस्त क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येते. मात्र सरसकट शेतकऱ्यांना सरसकट सवलती देण्यात येत नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरी असल्याने त्या पाण्यावर बागायती शेती करू शकतात. त्यामुळे अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांनाच टंचाईसंबंधीच्या सर्व सोयी देण्यात येतात. टंचाई परिस्थितीत वीजबिलाची थकबाकी असली तरीही त्यांचा विद्युत प्रवाह खंडित करू नये, असे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत.

३५ गावांमध्ये भातपीकच नाही...
जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरला सुधारित हंगामी पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यंदाही १५३८ गावांपैकी १५०३ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अंतिम पैसेवारी १५ डिसेंबरला जाहीर होईल. ३५ गावांमध्ये भातपीकच नाही. त्यात दापोली ३ खेडमधील १, रत्नागिरीतील १७, संगमेश्‍वरमधील ४ आणि राजापूर तालुक्यातील १० गावांचा समावेश आहे


इतर ताज्या घडामोडी
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...