बिथरलेल्या पाकिस्तानचा दुजोरा; भारतात घुसविली विमाने

बिथरलेल्या पाकिस्तानचा दुजोरा; भारतात घुसविली विमाने
बिथरलेल्या पाकिस्तानचा दुजोरा; भारतात घुसविली विमाने

श्रीनगर : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे.

undertook strikes across LoC from Pakistani airspace. Sole purpose of this action was to demonstrate our right, will and capability for self defence. We do not wish to escalate but are fully prepared if forced into that paradigm

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत तीन लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी हवाई दलाने पाकिस्तानी तळावरून उड्डाण घेत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून हल्ला केल्याचे प्रवक्ते डॉ. महंमद फैजल यांनी म्हटले आहे. 

फैजल यांनी म्हटले आहे, की आम्ही हा हल्ला आमच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे केला आहे. आमच्या स्वरक्षासाठी सज्ज आहोत हे आम्हाला दाखवायचे होते. आम्हाला य़ुद्धाची तीव्रता वाढविण्याची इच्छा नाही, पण गरज पडल्यास आम्ही तयार आहोत. पाकिस्तान झिंदाबाद. 

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघऩ केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com