पाकिस्तानचा नुकसान न झाल्याचा कांगावा

पाकिस्तानचा नुकसान न झाल्याचा कांगावा
पाकिस्तानचा नुकसान न झाल्याचा कांगावा

​नवी दिल्ली : भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केली. मात्र भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे काहीच नुकसान झाले नसल्याचा दावा पाकिस्तानचे मेजर जनरल असिफ गफूर यांनी केला आहे. 

भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादांच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल असिफ यांनी ट्विटरवरुन माहिती दिली.  मात्र, या हल्ल्यात कोणीही ठार झालेले नाही आणि पाकिस्तानचे काहीही नुकसान झालेले नाही असा दावा केला आहे. 

Indian Air Force violated Line of Control. Pakistan Air Force immediately scrambled. Indian aircrafts gone back. Details to follow.

Indian aircrafts intruded from Muzafarabad sector. Facing timely and effective response from Pakistan Air Force released payload in haste while escaping which fell near Balakot. No casualties or damage.

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एलओसी ओलंडली तेव्हा पाकिस्ताननेही त्यांना लगेच प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली मात्र, भारतीय विमानांनी तेथून पळ काढला अशी मुक्ताफळेही त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये उधळली तर दुसऱ्यांदा या हल्ल्याबद्दल माहिती देताना पाकिस्तानचे हवाई दल आणि भारतीय हवाई दलात चकमक झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच भारतीय हवाई दलाचे विमान पळून जाताना मोकळ्या जागेत पडल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Payload of hastily escaping Indian aircrafts fell in open.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com