Agriculture News in Marathi Pakistan's cotton imports will increase | Page 3 ||| Agrowon

पाकिस्तानची कापूस आयात वाढणार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

पाकिस्तानचा कापूस वापर वाढणार असून, आयातही अधिक राहील, असे यूएसडीए आणि पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. तसेच येथे मागील चार आठवड्यांतच कापूस दरात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

पुणे : पाकिस्तानचा कापूस वापर वाढणार असून, आयातही अधिक राहील, असे यूएसडीए आणि पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. तसेच येथे मागील चार आठवड्यांतच कापूस दरात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय दरामुळे एकीकडे येथून सूत आणि कापूस निर्यात होईल आणि दुसरीकडे आयातही वाढेल, असे उद्योगांनी सांगितले आहे.

पाकिस्तान यंदा ६४ लाख गाठी कापूस आयात करेल आणि या संधीचा लाभ भारतालाही होऊ शकतो, त्यासाठी निर्यात होणे गरजेचे आहे. शेजारील पाकिस्तानला निर्यात झाल्यास देशांतर्गत दराला आणखी आधार मिळेल, असे जाणकारांनी सांगितले आहे. यूएसडीएने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात पाकिस्तानमधील कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, कापूस आयात विक्रमी होणार असल्याचे म्हटले आहे.

सिंध प्रांतात उत्पादकता वाढीचा अंदाज असून, देशाचे उत्पादन वाढेल. यंदा सिंध प्रांतात ४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. शिवाय पाकिस्तानात विविध देशांतून ६४ लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात ही विक्रमी आयात असेल, याआधी २००८ मध्ये ५२ लाख गाठी कापूस आयात झाली होती. २००८ मध्ये पाकिस्तानचा कापूस वापर १५४ लाख गाठींवर पोहोचला होता. तेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानचा वापर १५० लाख गाठींवर पोहोचला होता.

कोरोनाकाळ वगळता बांगलादेशचा कापूस वापर सरासरी १३५ लाख गाठींचा झाला आहे. यूएसडीएच्या मते पाकिस्तानचा कापूस वापर यंदा १४६ लाख गाठींवर पोहोचेल. परंतु पाकिस्तान सरकारच्या मते यंदा ९३.७ लाख गाठी कापूस उत्पादन होणार आहे. हा अंदाज युएसडीएच्या अंदाजापेक्षा ८ लाख गाठींनी अधिक आहे. 

पाकिस्तानमधील सूतगिरण्यांच्या मते यंदा देशातील कापूस उत्पानात काहीशी वाढ होणार असून, ९४ लाख गाठींवर पोहोचेल. दक्षिण पाकिस्तानमधील काही जिल्ह्यांमध्ये नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. तर कराची कॉटन असोसिएशनच्या मते, मागील चार आठवड्यांत कापसाच्या दरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यूएसडीएने यंदा पाकिस्तानमध्ये कापसाचा शिल्लक साठा ३० लाख गाठींवर राहील, असे म्हटले आहे.

मात्र पाकिस्तानातील उद्योगाच्या मते त्यांच्याकडे खूपच कमी कापूस साठा शिल्लक आहे. तसेच यंदा उत्पादन वाढणार असल्याने नवीन कापूस बाजारात येईपर्यंत उद्योगाला टंचाई भासेल. पाकिस्तानमध्ये जुलै ते ऑक्टोबर २०२१ या काळात १४ लाख गाठी कापूस आयात झाली, आयात विचारात घेता यंदा आयात वाढीचा अंदाज आहे. या संधीचा लाभ भारताला होईल, त्यासाठी निर्यात आवश्यक आहे.


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...