सिंचन व्यवस्थापनात पालखेड विभाग सरस ः अहिरराव

अल्प मनुष्यबळ असताना हे मान्य करून सिंचन सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोचविसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून कार्यक्षमता सिद्ध केली पाहिजे. या अनुषंगाने नाशिकच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पालखेड पाटबंधारे विभागाची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी काढले.
Palakhed Division in Irrigation Management Saras: Ahirrao
Palakhed Division in Irrigation Management Saras: Ahirrao

नाशिक : अल्प मनुष्यबळ असताना हे मान्य करून सिंचन सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोचविसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून कार्यक्षमता सिद्ध केली पाहिजे. या अनुषंगाने नाशिकच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पालखेड पाटबंधारे विभागाची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी काढले.

पालखेड पाटबंधारे विभागात डॉ. संजय बेलसरे यांनी गेल्या १३ वर्षांपासून २ ऑक्टोबर रोजी सिंचननामा अहवाल प्रकाशित केला. या पासून ही परंपरा सुरू आहे. सन २०१९-२०चा अहवालाचे प्रकाशन श्रीमती अहिरराव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी व मुकूंद चौधरी, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत वाघवकर तसेच विभागातील उपअभियंते कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती अहिरराव यांनी शासनाच्या फाॕर्मर फ्रेंडली पोर्टलच्या संकल्पनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या संकल्पनेसाठी आळंदी या प्रकल्पाची निवड केली असून तेथील सर्व शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर्सची माहिती प्राप्त करुन घेतली आहे. शासनातर्फे या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रश्नावली देऊन सिंचनाबाबत त्यांच्याकडून फिडबॕक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी सर्व धरणामध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून यावर्षी सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

प्रास्तविकात श्री. गोवर्धने म्हणाले की, पालखेड पाटबंधारे विभागाने सन २०१९-२०मध्ये केलेली कामे, सिंचनासंबंधीची माहिती विशेषतः सिंचन क्षेत्रात झालेली वाढ, पाणीपट्टी वसुलीत झालेली वाढ तसेच पाणी गळती कमी करण्यात केलेले प्रयत्नांचा आढावा घेऊन विभागास व पाणी वापर संस्थांचे मिळालेले पुरस्कार याबाबत माहिती दिली.

श्री. चौधरी म्हणाले की, दिवसेंदिवस बिगर सिंचन पाणी मागणी वाढत असताना सिंचनाचे पाणी कमी होत आहे. त्यात अधिकारी, कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांव्दारे सिंचन व्यवस्थापन करणे खूप जिकिरीचे झाले आहे. अनुभवी कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नमूद केले.

श्री. शिंपी यांनी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. या सर्वांचा परिणाम सिंचन कार्यक्षमतेवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी वापर संस्थेचे प्रतिनिधी वाघवकर म्हणाले की, वाघाड उजव्या कालव्याचे गेट मधून दररोज सुमारे १५ ते २५ क्युसेक पाणी गळती थांबविण्याचे आव्हानात्मक कामही गोवर्धने व टीमने यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com