नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे लिलाव सुरू
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आवार असलेल्या पालखेड मिरचीचे येथे बुधवारी (ता.२४) सायंकाळी द्राक्षमणी लिलावाचा प्रारंभ बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे उपस्थितीत करण्यात आला.
नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आवार असलेल्या पालखेड मिरचीचे येथे बुधवार (ता.२४) रोजी सायंकाळी द्राक्षमणी लिलावाचा प्रारंभ बाजार समितीचे संचालक रामभाऊ माळोदे उपस्थितीत करण्यात आला.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गेल्या काही वर्षांपासून बाजार समितीने येथे द्राक्ष मणी लिलाव सुरू केले आहेत. शेतकऱ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. योग्य वजनमाप व रोख चुकवती (व्यवहार) बरोबरच जास्तीत जास्त दर यामुळे येथे द्राक्षमणी विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी द्राक्षमणी लिलावासाठी विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.
या वेळी माजी संचालक बाबासाहेब शिंदे, कचूनाना शिंदे, बाळासाहेब खैरे, सतीश जाधव, शिवराज शिंदे, शरद जाधव, मनोहर थेटे, दिनेश थेटे, बंटी बोथरी, मंगेश छाजेड, गणेश कुलकर्णी, रोशन घुले, केशव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
असे राहिले दर
बुधवारी (ता.२४) रोजी उपबाजार आवारात २५५ क्रेट द्राक्ष मणी आवक झाली. त्यास किमान ६५ व कमाल २५० दर मिळाला. सरासरी दर १७० रुपये राहिला. गुरुवारी (ता.२५) रोजी आवक ३०० क्रेट झाली. त्यास ५० ते १८५ तर सरासरी १४० रुपये दर मिळाला.