पालघर पोटनिवडणुकीत २० अर्ज दाखल

पालघर पोटनिवडणुकीत २० अर्ज दाखल
पालघर पोटनिवडणुकीत २० अर्ज दाखल

पालघर ः पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची संख्या आता २० झाली आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ३ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली होती. आजपर्यंत १४ उमेदवारांनी २० अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी समता सेनेतर्फे अपक्ष म्हणून संदीप जाधव, बविआचे बळीराम जाधव, संत भसरा, राजेश पाटील, कॉंग्रेसतर्फे दामोदर शिंगडा, मधुकर चौधरी, भाजपतर्फे पास्कल धनारे, राजेंद्र गावित तसेच भारिपचे अशोक गोविंद शिंगडा यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यापूर्वी ८ मे रोजी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी दोन, तर ९ मे रोजी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे किरण राजा गहला, वनशा सुरजी दुमाडा यांनी उमेदवारी यांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (ता.११) अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १४ मे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com