Agriculture news in Marathi, Palkhi gete on pandharpur | Agrowon

..आली समीप पंढरी !
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019
भाग गेला, शीण गेला । 
अवघा झाला आनंद ।
प्रेमरस बैसली मिठी । 
आवडी लाठी मुखाची ।।
भाग गेला, शीण गेला । 
अवघा झाला आनंद ।
प्रेमरस बैसली मिठी । 
आवडी लाठी मुखाची ।।

सोलापूर ः लक्षवेधी रिंगण सोहळे, बंधुभेटीचा अनुपम्य क्षण यांसारखे विविध अनुभव डोळ्यांत साठवत गेल्या महिनाभरापासून राज्यभरातून निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर वाखरीमध्ये बुधवारी (ता. १०) मुक्कामासाठी विसावल्या आहेत. आता विठुरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ वारकऱ्यांना अनिवार झाली आहे. टाळ-मृंदगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पालखी मार्ग दणाणून गेला आहे. दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या (शुक्रवारी) होत आहे. सोहळ्यातील श्री. विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या महापूजेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सपत्नीक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता ही महापूजा होईल. 

आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह राज्यभरातील सगळ्या पालख्या बुधवारी एकाच मार्गावर आल्याने पंढरपूर-पुणे महामार्गावर भक्तीचा आगळा अनुभव प्रत्ययास येत होता. टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषानाने उत्साहाला भरते आले होते. पंढरी समीप आल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विठुरायाच्या भेटीची ओढ अनिवार झाल्याचे दिसत होते. भंडीशेगावातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुढे मार्गक्रमण केले. दुपारी बाजीराव विहिरीनजीक सोहळ्यातील महत्त्वाचे असे उभे रिंगण पार पडले. त्यानंतर गोल रिंगणही झाले. 

संत तुकोबाराय, संत सोपानकाका यांच्या पालख्याही या मार्गावर आल्या. आता गुरुवारी (ता. ११) दुपारी या सर्व पालख्या पंढरपुरात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पंढरपुरातही संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालख्याही दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वेगळे चैतन्य पंढरीत निर्माण झाले आहे. उद्याच्या आषाढी वारीतील चंद्रभागेचे स्नान आणि विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे चार लाखांहून अधिक वारकरी दाखल झाले आहेत. 

पंढरीत वारकऱ्यांची रीघ
आषाढी वारीचा मुख्य सोहळा शुक्रवारी होणार असला तरी, बुधवारपासूनच (ता. १०) पंढरपुरात वारकऱ्यांची रीघ लागली आहे. रेल्वे, एसटी आणि खासगी वाहने पंढरपूरच्या चोहोबाजूंनी दिसत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...