agriculture news in marathi, palkhi at pandharpur, Maharashtra | Agrowon

पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 जुलै 2018

भाग गेला, शीण गेला ।
अवघा झाला आनंद ।। 

अशी भावना मनात साठवत ऊन, वारा, पाऊस झेलत गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर दाखल झाल्या आहेत. या सोहळ्यातील मुख्य अशा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालख्या शनिवारी (ता. २१) वाखरीत मुक्कामी विसावल्या. उद्या रविवारी (ता. २२) त्या पंढरपुरात दाखल होत आहेत. 

भाग गेला, शीण गेला ।
अवघा झाला आनंद ।। 

अशी भावना मनात साठवत ऊन, वारा, पाऊस झेलत गेल्या दोन आठवड्यांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विविध संतांच्या पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर दाखल झाल्या आहेत. या सोहळ्यातील मुख्य अशा संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज पालख्या शनिवारी (ता. २१) वाखरीत मुक्कामी विसावल्या. उद्या रविवारी (ता. २२) त्या पंढरपुरात दाखल होत आहेत. 

दरम्यान, आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा उद्या सोमवारी (ता. २३) होत असून, पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. भंडीशेगावातील मुक्काम आटोपून सकाळी संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. दुपारी बाजीराव विहिरीजवळ सोहळ्यातील उभे रिंगण पार पडले. त्यानंतर गोल रिंगणही झाले. संत तुकोबाराय, संत सोपानकाका यांच्या पालख्याही याच मार्गावर आल्या. एकाच वेळी सर्व पालख्या पंढरपूर-पुणे महामार्गावर एकत्र आल्याने पंढरपूर ते वेळापूर यादरम्यान भक्तीचा एक वेगळा उत्साह शिगेला  पोचल्याचे दिसले.

टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघा परिसर उत्साहाने भारून गेला होता. विठुरायाची पंढरी आता अवघ्या काही अंतरावर असल्याने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह दिसून येत होता. सुमारे पंधरवडाभर चालून थकले असतानाही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील विठ्ठल भेटीचा आनंद लपून राहत नव्हता.

जाऊ देवाचियाचा गावा । 
देव देईल विसावा ।। 
देवा सांगू सुखदुःख। 
देव निवारिल भूक ।।

असं बरंचसं काही सुखःदुख देवाला सांगण्यासाठी, त्याच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी वारकरी अखंड हरिनामाचा जयघोष करत पंढरीत दाखल होतात. दुसरीकडे पंढरपुरातही संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालख्या दाखल झाल्याने भक्तीला उधाण आले. या वारीत चंद्रभागेतील स्नानाला विशेष महत्व असल्याने त्यासाठी वारकऱ्यांची गडबड सुरू आहे. आज वाखरीहून सर्व पालख्या पंढरीत प्रवेश करतील. 

पंढरीत अडीच लाख वारकरी दाखल
आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीतही वारकऱ्यांची गर्दी वाढत असून, शहरातील मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये किर्तन, प्रवचने सुरू आहेत. अनेक ठिकाणी भजनाचे सूर आळवले जात आहेत. शनिवारी दिवसभर वारकऱ्यांची रीघ सुरूच होती. शनिवारी सुमारे अडीच लाख वारकरी पंढरीत दाखल झाले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मिनिटाला २० ते ३० वारकरी दर्शन करून बाहेर पडत आहेत. दर्शनरांगेत सुमारे १५ ते १८ तास दर्शनासाठी लागत आहेत. दर्शनाची रांग शनिवारी गोपाळपूरकडील पत्राशेडच्या पुढे गेली.


इतर अॅग्रो विशेष
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...