agriculture news in marathi Pallavi and Ganesh Hande Made Post harvest Sale chain in Junnar, Pune | Agrowon

थेट भाजीपाला विक्रीचे तयार केले मॉडेल 

गणेश कोरे
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

गोळेगाव (ता.जुन्नर,जि.पुणे) येथील पल्लवी आणि गणेश हांडे या दांपत्याने शेतकरी गटाच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्रीबरोबर विविध भाजीविक्री करणाऱ्या कंपन्यांना दररोज विविध प्रकारचा भाजीपाला पुरविण्यात त्यांना यश आले आहे. 

गोळेगाव (ता.जुन्नर,जि.पुणे) येथील पल्लवी आणि गणेश हांडे या दांपत्याने दहा वर्षांपूर्वी पारंपरिक शेतीला सेंद्रिय शेतीची जोड दिली. समविचारी शेतकऱ्यांचा गट तयार केला. गटाच्या माध्यमातून थेट भाजीपाला विक्रीबरोबर विविध भाजीविक्री करणाऱ्या कंपन्यांना दररोज विविध प्रकारचा भाजीपाला पुरविण्यात त्यांना यश आले आहे. 

गोळेगाव (ता.जुन्नर,जि.पुणे) येथील पल्लवी आणि गणेश हांडे हे पारंपारिक शेती करणारे दांपत्य. त्यांच्या चार एकर शेतीमधील भाजीपाला ते पांरपरिक पद्धतीने मुंबई बाजार समितीमध्ये विक्रीस पाठवायचे. काही वर्षांपूर्वी खासगी कंपन्यांनी ऑनलाइन भाजीपाला विक्री व्यवसाय सुरु केला. याच दरम्‍यान त्यांचा नाशिकमधील ऑनलाइन भाजीपाला भाजीपाला विक्री करणाऱ्या कंपनीबरोबरीने संपर्क आला. या कंपनीच्या मागणीनुसार भाजीपाला पुरवठा करत असतानाच, गणेश यांचा मुंबईमध्ये राहणारा भाचा मनीष याने भाजीपाल्यासाठी स्थानिक ग्राहक शोधण्यास प्रारंभ केला. ग्राहकांशी संवाद साधत त्यांच्या मागणीनुसार एक, दोन किलो पॅकिंगमध्ये भाजीपाला हा बाजार समितीमध्ये पाठविण्यात येणाऱ्या गाडी सोबत पाठवला जात होता.या उपक्रमामुळे टप्प्याटप्प्याने ग्राहकांच्या संख्येबरोबरच कंपन्यांसोबत संपर्क वाढला. 

शेतकरी गटाची स्थापना ः 
पाच वर्षांपूर्वी गो फॉर फ्रेश या कंपनीच्या प्रतिनिधींनी गणेश हांडे यांच्या शेतीला भेट देत नियमित भाजीपाला पुरवठा करण्याची मागणी केली. ही संधी लक्षात घेऊन हांडे यांनी सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करू इच्छिणाऱ्या गावातील दहा शेतकऱ्यांचा स्वराज युवा आत्मा शेतकरी गट स्थापन केला. गटातील शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन आणि दशपर्णी अर्क, जीवामृत, शेणखत निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे ५० टक्यांपर्यंत निविष्ठांचा खर्च कमी झाला. या प्रकारे टप्याटप्याने आता वीस शेतकऱ्यांच्या गटातून सुमारे ५० एकरावर विविध फळे आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. या सर्व शेतकऱ्यांचे अपेडा मार्फत सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यात आले आहे. सध्या दररोज तीन टन भाजीपाल्याचा पुरवठा सुरु असून, यातून सुमारे साठ हजारांची उलाढाल होते. 

असे आहे पीक नियोजन 
कंपन्यांच्या मागणीनुसार प्रत्येक शेतकऱ्याला पीक ठरवून दिले जाते. पिकांच्या हंगामानुसार चक्राकार पद्धतीने नियोजन असते. यानुसार सुमारे चाळीस प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. गटाच्या मागणीनुसार भाजीपाला पुरवठा केला जातो. अतिरिक्त भाजीपाल्याची विक्री स्थानिक बाजारपेठेसह बाजार समितीमध्ये केली जाते. 

असा ठरतो दर ः 
भाजीपाल्याचा दर ठरविणे ही मोठी क्लिष्ट प्रक्रिया होती. मात्र यावर गटातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत एका पद्धतीचा अवलंब केला. जुन्नर बाजार समितीच्या ओतूर, आळेफाटा या उपबाजारातील प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला भाजीपाला दराची माहिती बाजार समितीकडून घेतली जाते. या दराची सरासरी काढून या दरावर १० टक्के जास्तीचा दर शेतकऱ्यांना दिला जातो. हा दर एक महिन्यासाठी कायम असतो. बाजारातील दरामध्ये कितीही चढ उतार झाला तर हाच दर शेतकऱ्यांना दिला जातो. 

शीतगृह, भाजीपाला निर्जलिकरणाचा विचार 
सध्या भाजीपाल्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यावर चांगला दर मिळत नाही. टोमॅटो, कोथिंबीर आणि इतर भाजीपाल्याची साठवणूक, प्रक्रियेसाठी शीतगृह आणि निर्जलीकरण करण्याचा विचार सुरु असल्याचे गणेश हांडे यांनी सांगितले. 

यांना होतोय पुरवठा ः 

  • शॉफ फॉर चेन, पुणे 
  • आरसीएफ सोसायटी, मुंबई 
  • ओ बास्केट, कल्याणीनगर (पुणे) 
  • मेरा फार्मर (खारघर, नवी मुंबई) 
  • सकल ऑरगॅनिक (पुणे) 

दोन तरुणांना वाहतुकीचा व्यवसाय 
शेतकरी गटामार्फत विविध कंपन्यांना सुटा भाजीपाला पुरवठा केला जातो. यासाठी गावातील दोन तरुणांनी भाजीपाला वाहतुकीसाठी वाहने खरेदी केली आहेत. पुरवठा सुरळीत आणि सुलभ व्हावा यासाठी प्रत्येक कंपनीसाठी विविध रंगाचे क्रेट दिले आहेत. यामुळे वाहतुकदारांना वितरित करणे सोपे होते. कंपनी चालक पुरवठा केलेला सुटा भाजीपाला स्वतःच्या नावाने (ब्रॅण्डींग) ग्राहकांना विक्री करतात. 

पुरस्कारांनी गौरव 
पल्लवी हांडे यांच्याकडे विविध कंपन्यांकडून भाजीपाल्याची मागणी नोंदविणे, शेतीमाल पॅकिंग करणे याची जबाबदारी आहे. शेतीबरोबर शेतीमाल पुरवठ्याचे काम यशस्वीपणे केल्याबद्दल त्यांना पुणे जिल्हा कृषी विभागाच्या आत्माचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव तसेच कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्यातर्फे आदर्श महिला शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया...
‘‘ आम्ही स्वराज युवा आत्मा गटाद्वारे भाजीपाला उत्पादन घेत आहे. सध्या टोमॅटोचे उत्पादन सुरु असून, मागणीनुसार गटाला पुरवठा सुरु आहे. बाजारभावापेक्षा १० टक्के जास्त दर आम्हाला मिळतो. 
- स्वप्नील शेरकर,गणेश काळे, शेतकरी. 

संपर्क 
गणेश हांडे - ९९७०४५७४९१ 
पल्लवी हांडे - ८७९६४२३३९१ 


इतर यशोगाथा
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
दोघे युवामित्र झाले जिरॅनिअम तेल उद्योजकनाशिक जिल्ह्यातील कृषी पदवीधर सौरभ जाधव व...
रब्बीत मोहरीचे पीक ठरतेय वरदानमेहकर (जि. बुलडाणा) तालुका परिसरात मोहरी...
गावाने एकी केली अन् जमीन क्षारपडमुक्ती...वसगडे (ता. पलूस, जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध...
ऊसपट्ट्यात केळीतून पीकबदलतुंगत (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील शिवानंद...
अंजीर पिकात मास्टर अन् मार्गदर्शकहीपुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील निंबूत येथील...
आधुनिक यंत्राद्वारे खूर साळणी झाली सोपीदुधाळ जनावरांमध्ये खूरसाळणीला मोठे महत्त्व आहे....
सेंद्रिय प्रमाणित मूल्यवर्धित मालाला...नांदेडपासून सुमारे पंधरा किलोमीटरवरील मालेगाव...
डांगी गायींचे संवर्धन करण्याचे व्रतआंबेवाडी (ता. अकोले, जि. नगर) येथील बिन्नर...
बचत गटाने दिली आर्थिक ताकद.आगसखांड (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील बारा...
बांबू प्रक्रिया उद्योगात देश-परदेशात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक या संस्थेने...
सुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...
निर्यातक्षम मिरची उत्पादनात हातखंडासुजालपूर (ता.जि.नंदुरबार) येथील अशोक व प्रवीण या...
माडग्याळी मेंढींपालनाचा तीन पिढ्यांचा...येळवी (ता. जि. जत) येथील पवार कुटुंबाच्या तिसरी...
व्हर्जिन कोकोनट ऑइल’ तंत्रज्ञान...गोवा राज्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत ‘...
शेतीपेक्षा ठरले वराहपालन फायदेशीर तळणी (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील जनार्दन व...