agriculture news in marathi Panan to act as mediator between police and vegetable vehicle drivers | Agrowon

पोलीस, वाहन चालकांमध्ये पणन मंडळ साधणार समन्वय

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

पोलीस आणि वाहन चालकांच्या संवाद आणि समन्वयासाठी हेल्पलाईन आणि टोल फ्री  १८००-२३३-०२४४  क्रमांक सुरु केला आहे. 

पुणे : कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या बंद असताना शहरातील फळे भाजीपाला आणि किराणा मालाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वाहन चालकांना पोलिसांचा होत असलेल्या त्रास कमी करण्यासाठी कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलीस आणि वाहन चालकांच्या संवाद आणि समन्वयासाठी हेल्पलाईन आणि टोल फ्री  १८००-२३३-०२४४  क्रमांक सुरु केला आहे. 

शहरात लॉखडाऊनमध्ये शेतमालाची विस्कळीत झालेली पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी विविध गृहनिर्माण सहकारी संस्थांना छोट्या वाहनांद्वारे (३ चाकी, ४ चाकी, पिकअप वाहन आदी ) शेतमाल पुरवठ्याची मागणी होत आहे. मात्र काही वेळा वाहने उपलब्ध होत नाहीत. तर अनेक वेळा पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार आणि छोट्या वाहन चालक मालकांनी पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३-०२४४ द्वारे आपली नोंदणी वाहनाचा क्रमांक चालक, मालकांच्या नावे क्रमांकासह करावी. या वाहनांची माहिती पोलीस प्रशासनासह शेतकऱ्यांना दिली जाईल. यामध्येही काही अडचण आल्यास पोलिसांसोबत सुसंवाद आणि समन्वय साधला जाईल, असे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. 

मात्र हे करत असताना वाहन चालक, मालक आणि शेतकऱ्यांनी यांनी शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करीत असताना त्यासाठी आवश्यक ते परवाने कृषी विभागाकडून घ्यावेत. पणन मंडळ केवळ पोलीस आणि वाहन चालकांसोबत समन्वय साधणारा दुवा असणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...