पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी मिरची बेळगावसह हैद्राबादला रवाना झाली

पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्षाचा थेट कोल्हापूरच्या ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्याला झाला आहे.
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी मिरची बेळगावसह हैद्राबादला रवाना झाली
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी मिरची बेळगावसह हैद्राबादला रवाना झाली

पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्षाचा थेट कोल्हापूरच्या ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्याला झाला आहे. सुरज खुरपे (मगरेवाडी, ता. शिरोळ) या शेतकऱ्याची सध्या ढोबळी मिरचीची काढणी सुरु असून, बेळगावला माल पाठविला जात आहे. त्यांची गाडी बेळगाव सीमेवर एका गावात अडविल्यानंतर त्यांनी पणन मंडळाच्या १८००-२३३-०२४४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून समस्या सांगितली, यावेळी मंडळाचे अधिकाऱ्याने सरपंचांसोबत चर्चा करुन वाहन मार्गस्थ केल्याने शेतकऱ्यांस मोठा दिलासा मिळाला आहे.  कोरोना लॉकडाऊनमध्ये परराज्यांतून शेतमालाचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने सुरु केलेल्या आंतरराज्य वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या नियंत्रण कक्षाद्वारे ९० फोन कॉल्सचे निराकरण करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. या कक्षासाठी २४ तास १४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले,‘‘आंतरराज्यीय शेतमाल वाहतुकी बरोबरच राज्याअंतर्गत वाहतूक, बाजार समिती बंद बाबतची सद्यःस्थिती वाहतुकीबाबत पासेस, भाजीपाला उपलब्धता व पुरवठादार याबाबत फोन कॉल्स प्राप्त होत आहेत. या येणाऱ्या कॉलनिहाय प्रत्यक्ष अडचण काय आहे ते जाणून घेण्यात येत असून अडचणनिहाय समन्वयाने निराकरण करुन शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, व्यापारी, वाहतूकदार, इ. घटकांचे समाधान करण्यात येत आहे. कॉलधारकांना त्यांच्या स्थानिक ठिकाणावरील कंट्रोल रुम्स, पोलीस क्षेत्रीय यंत्रणा आदि ठिकाणांची माहिती देऊन फळे व भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.’’  याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचा अनुभव ढोबळी मिरची उत्पादक सुरज खुरपे (रा.मगरेवाडी, शिरोळ) सांगितला. ते म्हणाले,‘‘माझी सध्या ६ एकरवर ढोबळी मिरचीची लागवड असून, लॉकडाऊनमुळे मिरची फेकून देण्याची वेळ आली होती. पणन मंडळाच्या टोल फ्री क्रमांकामुळे मी माझी ६ टन ढोबळी घेऊन बेळगावला निघालो होतो. यावेळी भोसरवाडी येथील गावाने माझी गाडी अडवत पुढे जाण्यास मनाई केली. यावेळी मी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ आणि सरपंचांना मार्गदर्शन करुन गाडी सोडण्यास सांगितली. आता वाहतूक सुरळीत असून, आज हैद्राबादला गाडी भरत आहे.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com