agriculture news in marathi panan Helpline helps farmers to cross the hurdles | Page 2 ||| Agrowon

पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी मिरची बेळगावसह हैद्राबादला रवाना झाली

गणेश कोरे
रविवार, 5 एप्रिल 2020

पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्षाचा थेट कोल्हापूरच्या ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्याला झाला आहे.

पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्षाचा थेट कोल्हापूरच्या ढोबळी मिरची उत्पादक शेतकऱ्याला झाला आहे. सुरज खुरपे (मगरेवाडी, ता. शिरोळ) या शेतकऱ्याची सध्या ढोबळी मिरचीची काढणी सुरु असून, बेळगावला माल पाठविला जात आहे. त्यांची गाडी बेळगाव सीमेवर एका गावात अडविल्यानंतर त्यांनी पणन मंडळाच्या १८००-२३३-०२४४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून समस्या सांगितली, यावेळी मंडळाचे अधिकाऱ्याने सरपंचांसोबत चर्चा करुन वाहन मार्गस्थ केल्याने शेतकऱ्यांस मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोना लॉकडाऊनमध्ये परराज्यांतून शेतमालाचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने सुरु केलेल्या आंतरराज्य वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु केला आहे. या नियंत्रण कक्षाद्वारे ९० फोन कॉल्सचे निराकरण करण्यात आल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. या कक्षासाठी २४ तास १४ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

याबाबतची माहिती देताना पवार म्हणाले,‘‘आंतरराज्यीय शेतमाल वाहतुकी बरोबरच राज्याअंतर्गत वाहतूक, बाजार समिती बंद बाबतची सद्यःस्थिती वाहतुकीबाबत पासेस, भाजीपाला उपलब्धता व पुरवठादार याबाबत फोन कॉल्स प्राप्त होत आहेत. या येणाऱ्या कॉलनिहाय प्रत्यक्ष अडचण काय आहे ते जाणून घेण्यात येत असून अडचणनिहाय समन्वयाने निराकरण करुन शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, व्यापारी, वाहतूकदार, इ. घटकांचे समाधान करण्यात येत आहे.

कॉलधारकांना त्यांच्या स्थानिक ठिकाणावरील कंट्रोल रुम्स, पोलीस क्षेत्रीय यंत्रणा आदि ठिकाणांची माहिती देऊन फळे व भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.’’ 
याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचा अनुभव ढोबळी मिरची उत्पादक सुरज खुरपे (रा.मगरेवाडी, शिरोळ) सांगितला. ते म्हणाले,‘‘माझी सध्या ६ एकरवर ढोबळी मिरचीची लागवड असून, लॉकडाऊनमुळे मिरची फेकून देण्याची वेळ आली होती. पणन मंडळाच्या टोल फ्री क्रमांकामुळे मी माझी ६ टन ढोबळी घेऊन बेळगावला निघालो होतो. यावेळी भोसरवाडी येथील गावाने माझी गाडी अडवत पुढे जाण्यास मनाई केली. यावेळी मी टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ आणि सरपंचांना मार्गदर्शन करुन गाडी सोडण्यास सांगितली. आता वाहतूक सुरळीत असून, आज हैद्राबादला गाडी भरत आहे.’’ 


इतर ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
बीबीएफ टोकण यंत्राने करा पेरणीरुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...