पाणंद रस्त्याची कामे आता सार्वजनिक बांधकामकडे : कृषिमंत्री डॉ. बोंडे

पाणंद रस्त्याची कामे आता सार्वजनिक बांधकामकडे : कृषिमंत्री डॉ. बोंडे
पाणंद रस्त्याची कामे आता सार्वजनिक बांधकामकडे : कृषिमंत्री डॉ. बोंडे

अमरावती ः शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्त्याचे महत्त्व लक्षात घेता ही कामे यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाव्दारे करण्याचा मानस असल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.  दर्यापूर येथे रविवारी (ता. २८) तालुक्‍यातील कृषीसह विविध विभागांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या सभेला आमदार रमेश बुंदीले, भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, तालुकाध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, मनीष कोरपे, मदन बायस्कार, तहसीलदार अमोल कुंभार, आत्मा समितीचे अरविंद नळकांडे उपस्थित होते.   कृषिमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, शेतमाल वाहतुकीत पांदण रस्त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या रस्त्याचे सर्वाधिक महत्त्व आहे. आत्तापर्यंत ही कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत होती. परंतु, जिल्हा परिषदेच्या कामाची गती संथ असल्याने पांदण रस्त्यांची कामे रखडली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याची दखल घेत यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पांदण रस्ते करता येतील का? याची चाचपणी केली जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत होत असलेली कामे समाधानकारक नाहीत. यामध्ये काम करणाऱ्या निष्क्रिय संस्थांना यापुढे काम न देण्यात येऊ नये. पीकविम्यासंदर्भात वाढत्या तक्रारी नंतर आता दक्षता समित्यांचे गठण करण्यात आले आहे. विमाविषयक तक्रारींच्या सोडवणुकीसाठी या समित्या काम करतील. कृषी सहायकांकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संपर्क कार्यालय अनिवार्य करण्यात आले आहे. पाणंद रस्त्याकरिता निधीत वाढ करण्यात आली आहे. आमदार तीन लाख, जिल्हा नियोजन पाच लाख तर पाच लाख मनरेगातून याप्रमाणे निधीचे विभाजन आहे. पाणंद रस्त्यासाठी प्रती किलोमीटर १६ लाख रुपयांपर्यंत खर्चात वाढीचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक योजनांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची उपलब्धता करण्याची सूचनाही त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com