Agriculture news in Marathi Panan's cotton purchase stopped in Pusad | Agrowon

पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

पुसद तालुक्यात सोमवार (ता. १५) पासून ‘पणन’ची शासकीय खरेदी बंद करण्यात आली आहे.

आरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता. १५) पासून ‘पणन’ची शासकीय खरेदी बंद करण्यात आली आहे. शासकीय खरेदी बंद झाली असली तरी खासगीमध्येही जगदंबा ॲग्रो, वरुड व गिरीश ॲग्रो, शेलू या दोन्ही खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची आवक नसल्याने जिन बंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वरुड येथील जगदंबा ॲग्रो येथे ‘पणन’ची शासकीय कापूस खरेदी बंद करण्यात आली. यामध्ये ४३ हजार ९३३.७१ क्विंटल कापूस घेण्यात आला.तर याच खरेदी केंद्रावर खासगीत केवळ ५००० हजार क्विंटल व शेलू येथील गिरीश ॲग्रो येथे २८००० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान कापसाचे दर वाढताच शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. आज रोजी खासगीत कापसाला ६००० हजार रुपयांवर प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने खेडा खरेदी करणारे खासगी व्यापारी जागेहून या भावात खरेदी करून कापसाची मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी नेऊन अधिक दरात कापूस विक्री करत आहे. याचाच परिणाम येथील खासगी कापूस खरेदी केंद्रावर झाला असून कापूस खरेदी बंद करण्यात
येणार आहे.

आवक नसल्याने जिनिंग वरील मजुरवर्गाला कोणते काम लावावे, असा प्रश्न जिनिंग मालका समोर उभा राहिला आहे. तर यंदा कापसाच्या उत्पादनात घट येऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वीच व उर्वरित शेतकऱ्यांनी ‘पणन’ला कापूस विक्री केला आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे घरी कापूस नसल्याचे सांगितले जात आहे. तर दरवाढ होत असल्याने फरदड घेऊन कापूस घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

यंदा ‘पणन’ची खरेदी लवकरच आटोपली. यातच खरेदीही कमी झाली तर खासगीतही कापसाची आवक नसल्याने बाहेर जिल्ह्यातून बोलाविलेल्या कुशल कामगारांना बसून मजुरी द्यावी लागत आहे. यामुळेच खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खेडा खरेदी करणारा व्यापारी वर्ग बाहेर ठिकाणी कापूस विक्रीस नेत आहे.
- आशिष चक्करवार, संचालक जगदंबा ॲग्रो, वरुड


इतर ताज्या घडामोडी
शहरातील आठवडे बाजारांवर महापालिका...पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला मध्यस्थाशिवाय थेट...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...
परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी...परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या...
काबुली हरभऱ्याचा दर आठ हजार रुपयांवरजळगाव  ः  खानदेशात काबुली हरभऱ्याची आवक...
‘रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप...सातारा :  ‘‘या वर्षी चांगला पाऊस पडला....
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ...अकोला : इतर मागासप्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७...
‘भरड धान्य खरेदी केंद्रांसाठी तातडीने...जळगाव  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात फक्त मका...
तापमानात वाढ होण्यास सुरुवातमार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील...
तेलकट डाग रोग व्यवस्थापनाच्या सहा...तेलकट डाग रोग (बॅक्टेरियल ब्लाइट किंवा बीबीडी)...
‘जलयुक्त’च्या कामाची धारवाडी, चिचोंडीत...नगर : जलयुक्त शिवार अभियानातील तक्रारी असलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी सदस्यांवर...अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या...
उत्तर सोलापुरात २३ गावांचे होणार...सोलापूर : ‘‘गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे...
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना...औरंगाबाद : ‘‘असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न...
खानदेशात जलसाठा मुबलक जळगाव : खानदेशात विविध प्रमुख सिंचन...
हरभरा दर सुधारल्याने नांदेडचे शेतकरी...नांदेड : ‘‘केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार...
परभणी जिल्ह्यात तुती लागवडीसाठी ५८५...परभणी ः ‘‘महारेशीम अभियानांतर्गत रेशीम शेती...
साताऱ्यात ४३१ कुटुंबांच्या घराचे स्वप्न...कऱ्हाड : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १००...
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस...
परभणी जिल्ह्यातील हरभऱ्याचा पीकविमा...परभणी ः लिमला (ता. पूर्णा) तसेच परिसरात यंदा...
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शासनाची...मुंबई : राज्यातील धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला,...