agriculture news in marathi, Panchaganga, Bhogavati at the level of danger | Agrowon

पंचगंगा, भोगावती धोक्याच्या पातळीवर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात असला, तरी राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भोगावती, पंचगंगा नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. संततधार नसला तरी थांबून थांबून जोरदार सरी सुरू आहेत. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढच होत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात असला, तरी राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भोगावती, पंचगंगा नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला आहे. संततधार नसला तरी थांबून थांबून जोरदार सरी सुरू आहेत. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढच होत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी मार्ग बंद आहेत.

 संभाजीनगर-बाचणी, गडहिंग्लज -नांगनूर, गारगोटी किल्ला -मूरगुड मार्ग, चंदगड- दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा-कोल्हापूर आणि आजरा-चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल- रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे.

कागल- बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड -अनूरमार्गे एसटी वाहतूक सुरू आहे. राधानगरी धरणाचे गुरुवारी रात्री दहा वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ आणि रात्री ११.१५ वाजता दरवाजा क्रमांक ६ बंद झाला.  केवळ ४ आणि ५ क्रमांकाचे २ दरवाजे सुरू आहेत. यामधून ४२५६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी शुक्रवारी (ता. २) सकाळी १० वाजता ४२ फूट ८ इंच आहे. एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ८.२९  टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. जिल्ह्यात अद्यापही ऐंशीहून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चांदोली धरणांतून पाणी सोडल्याने वारणा व कृष्णा नद्यांचे पाणी वेगात वाढत आहे, कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...