पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीस

कोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या तक्रारीची दखल घेत मंडळाने नोटीस बजावली. जयंती नाल्यातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे आज सकाळी देसाई यांच्या निदर्शनास आले. त्यांनी फोनवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली. नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. त्या करण्यात आपण अपयशी ठरला आहात. प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या कालबद्ध उपाययोजना करणार, याची माहिती द्यावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील नाल्यातून सांडपाणी मिसळून नदी, नाल्यांचे प्रदूषण होत आहे. वेळोवेळी कायदेशीर कारवाई करून, संधी देऊन उपाययोजना झालेल्या नाहीत. प्रदूषण रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. न्यायालयाने वेळावेळी यासंबंधी निर्देश दिले आहेत, असेही मंडळाने नोटिसीत म्हटले आहे.

पंपिंग बंद पडले, की सांडपाणी नदीत शहरातील सांडपाणी जयंती नाल्यात येते. तेथून ते कसबा बावडा येथील एसटीपीकडे वळविले जाते. जयंती नाल्यावरील पंपिंग बंद पडले, की सांडपाणी थेट नदीत जाते. मैलायुक्त सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी पात्र दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com