नगर जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण 

नगर जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण 
नगर जिल्ह्यात दोन लाख ३७ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण 

नगर ः पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता. ७) पर्यंत १५२९ गावांतील २ लाख ३७ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील ३ लाख ३ हजार १३३ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही सुमारे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कषी विभाग पोचलाच नाही असे दिसत आहे. 

नगर जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. दोन दिवसांत काही भागांत उघडीप  दिली असली तरी गुरुवारी (ता. ७) काही भागांत पावसाने हजेरी लावलीच. सतत होणाऱ्या पावसाने खरीप व रब्बीमधील बहुतांश पिकांचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू असल्याचे सांगितले जात असताना अजूनही कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी अनेक गावांत पोचले नसल्याची अहवालावरून दिसून येत आहे. 

प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार, गुरुवारपर्यंत १५२९ गावांतील २ लाख ३७ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावरील ३ लाख ३ हजार १३३ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रशासनाकडे आलेल्या प्राथमिक नजर अहवालानुसार ४ लाख ८५ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यामुळे प्राप्त अहवालानुसार अजूनही सुमारे सुमारे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कषी विभाग पोचलाच नसल्याचे स्पष्ट होत आहे. बहुतांश भागात पंचनामे करण्यासाठी कर्मचारी गेले नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. झालेल्या नुकसानीचे २४ तासांत पंचनामे होणे गरजेचे आहे. दोन दिवसांपासून ज्या भागात पावसाची उघडीप आहे तेथे कापूस वेचणीला सुरवात झाली आहे. तेथे नुकसान कसे ग्राह्य धरणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

गुरुवारपर्यंत झालेले पंचनामे (हेक्टर क्षेत्र व कंसात शेतकरी) :  ः नगर ः ६४३१ (८९३२), पाथर्डी ः ३१०३८ (४१९३१), पारनेर ः ८३८४ (११३३१), कर्जत ः ९१४५ (१२३६२), श्रीगोंदा ः१९७८७ (२७७२३, जामखेड ः २८८५ (५४८७), श्रीरामपूर ः२०६८२ (२३८२३), नेवासा ः २१८६० (२६८०२), शेवगाव ः २३९२५ (२६९२५), राहुरी ः १८०८६ (२५४८२),  संगमनेर ः १७०४६ (१९०६५), अकोले ः ९८७० (२०२९१), कोपरगाव ः २६३७२ (३५१९८), राहाता ः २१९६१(१७८९१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com