रत्नागिरीतील १४८९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण

पीक नुकसानीची पाहणी करताना प्रशासकीय कर्मचारी
पीक नुकसानीची पाहणी करताना प्रशासकीय कर्मचारी

रत्नागिरी  ः ‘क्यार’ चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील ३६८० हेक्टरवरील भात व नागली पिकांचे नुकसान झाले आहे. शनिवारपर्यंत (ता. २) १४८९ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या पावसामुळे व क्यार चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नाचणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे काम ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांच्यामार्फत सुरू आहे. पंचनाम्यांबाबत शेतकऱ्यांच्या साह्यासाठी तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नुकसानीचा अहवाल शनिवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे सादर करावयाचे होते; मात्र अपुरे मनुष्यबळ आणि प्रत्यक्ष क्षेत्र यामुळे अजून दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

जिल्ह्यात भात व नागली लागवडीचे क्षेत्र ७९,१४४ हेक्टर आहे. पावसामुळे बाधित नजर अंदाजित क्षेत्र ३,६८० हेक्टर इतके आहे. आत्तापर्यंत नेमण्यात आलेल्या यंत्रणेमार्फत ८३५ गावातील १६,१०१ शेतकऱ्यांचे पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. ५७८ गावांतील पंचनामे करावयाचे शिल्लक आहेत. पंचनामे करताना भातशेतीचे नुकसान झाल्याचा पुरावा महत्त्वाचा आहे. शासनाच्या आदेशानुसार खरीप पिकाला हेक्टरी ६ हजार २०० रुपये नुकसानभरपाई दिली जाते. त्यात अद्यापही बदल झालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, की नुकसान झालेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. सोमवारपर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com