सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी पंचसूत्री ः श्री श्री रविशंकर

बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असून, ते योग्य करण्यासाठी नशेबाजी रोखण्याबरोबर जलस्रोत बळकट करणे, वृक्षारोपण, नैसर्गिक शेती आणि गोसंगोपन ही पंचसूत्री अवलंबली पाहिजे.
Panchasutri for Social and Mental Health: Sri Sri Ravi Shankar
Panchasutri for Social and Mental Health: Sri Sri Ravi Shankar

पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक स्वास्थ बिघडत असून, ते योग्य करण्यासाठी नशेबाजी रोखण्याबरोबर जलस्रोत बळकट करणे, वृक्षारोपण, नैसर्गिक शेती आणि गोसंगोपन ही पंचसूत्री अवलंबली पाहिजे. गोसंगोपनासाठी प्रत्येक शहरात गोशाळा आवश्यकच आहेत,’’ असे ठाम मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे मंगळवारी (ता. २१) देशी गोवंशाची समग्र माहिती देणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. यानिमित्ताने सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी श्री श्री रविशंकर यांच्याशी संवाद साधला. श्री श्री रविशंकर यांनी देशी गोवंश, शांती, मैत्री आणि समृद्धी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

पितृपंधरवड्याच्या सांस्कृतिक महत्त्वाबाबत श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘तुमच्याकडे केवळ आर्थिक समृद्धी असून उपयोग नाही, तर मनःशांतीही महत्त्वाची असते. तणावमुक्त जीवनच सुखी जीवनाचा पाया आहे. समृद्धी व शांती एकमेकांना पूरक आहे. आपण केवळ पूर्वजांमुळे या भूतलावर आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांच्याप्रति ‘तर्पण’ करणे म्हणजे, श्रद्धांजली अर्पण करणे होय. पूर्वजांनी सांगितलेल्या नियमांचे आचरण केल्यास मनःशांती मिळेल. आपण त्यांच्याकडून आशीर्वाद मागत असतो. भारताप्रमाणे चीन, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका, सिंगापूर येथेही याच पद्धतीची प्रथा वेगळ्या प्रकारे पाळली जाते. प्रियजनांच्या स्मरणार्थ ही परंपरा आहे.’’

समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांबद्दल शंका उपस्थित केल्या जातात. ही परिस्थिती कशी बदलता येईल, या पवार यांच्या प्रश्‍नावर श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘शंकेचे तीन प्रकार असतात. स्वतःवर शंका असणे, लोकांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेणे आणि तिसरा प्रकार देवाच्याच अस्तित्वावर शंका घेणे. देवाला आपण प्रत्यक्ष पाहत नसल्याने त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतो. अनेकदा आपली जवळच्या लोकांकडून फसवणूक झाल्याने लोकांच्या प्रामाणिकपणावर शंका येते. यातून स्वतःवर शंका घ्यायला लागतो. स्वतःवरील शंका घेणे बंद केले पाहिजे. आत्मविश्वासाने स्वतःकडे पाहावे. स्वतःवरील विश्वास कायम ठेवल्यास दुसऱ्याबद्दल कधीही शंका निर्माण होणार नाहीत.’’

 गाई व वृक्षसंगोपन व्हावे प्रत्येक शहरात गोशाळा असलीच पाहिजे, असे ठाम मत व्यक्त करत श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘अनेक शहरांतील मोकळ्या जागांत काँक्रीटची जंगले उभी राहत आहेत, त्याऐवजी गोशाळा उभ्या राहिल्या पाहिजेत. त्याचा पर्यावरणाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. शहरात गोसंगोपनाबरोबर नक्षत्रवनांचीही उभारणी केली पाहिजे. तुळस, लिंबू, आवळा, पिंपळ अशा उपयुक्त वृक्षांची लागवड करण्याची वेळही आता आली आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com