पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा करा ः पाटील

कोल्हापूर : ‘‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा एजन्सी नेमून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा’’, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
 Panchganga river pollution control Plan the action: Patil
Panchganga river pollution control Plan the action: Patil

कोल्हापूर :  ‘‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेला पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा एजन्सी नेमून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा’’, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण सुक्ष्म कृती आराखड्याबाबत आढावा बैठक झाली. खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा समावेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखड्यात करावा. त्याचबरोबर इचलकरंजीसाठी झेडएलडीचा प्रकल्प, संबंधित नगरपरिषद, गावांची गरज लक्षात घेऊन आराखड्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबाबत समावेश असावा. यासाठी प्रदूषण नियंत्रण  मंडळाने एजन्सी नेमावी आणि या एजन्सीच्या माध्यमातून अंदाजित रक्कमेसह अंतिम आराखडा तयार करावा.’’ 

माने म्हणाले, ‘‘इचलकरंजी येथील झेडएलडी प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्याचा सहभाग असणारी योजना असावी. त्याचबरोबर कोणते तंत्रज्ञान वापरणार याचा समावेश असावा. एकूणच महसूल निर्माण करण्याचे मॉडेल या आराखड्याच्या माध्यमातून तयार करावे.’’ 

आवाडे म्हणाले, ‘‘इचलकरंजीतील नवीन प्रक्रिया प्रकल्पाबाबत, नागरी विषयावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा.’’ जाधव म्हणाले, ‘‘एसटीपी प्रकल्पाचा दर्जा निवडण्याची आवश्यकता आहे. त्यावर जास्त लक्ष द्यावे.’’ 

जिल्हाधिकारी  देसाई म्हणाले, ‘‘संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत सुचवावे. म्हणजे आराखड्यात त्याचा समावेश करता येईल. सर्वांच्या सूचनांचा समावेश करून अंदाजित रक्कमेसह हा आराखडा पूर्ण करण्यात येईल.’’ 

समिती सदस्य उदय गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com