Agriculture news in marathi Panchnama started in Pune at a fast pace | Agrowon

पुण्यात पंचनामे गतीने सुरू

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

पुणे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग आला आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान समोर येऊ लागले आहे.

पुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग आला आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान समोर येऊ लागले आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शेत, पिके वाहून जाणे, दरडी कोसळणे, भूस्खलन होणे आदी घटना समोर आल्या आहेत. आणखी तीन चार दिवसांत नुकसानीची माहिती समोर येऊन भरपाईचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.  
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम भागातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

खेड तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील एकलहरे येथील बांगरवाडीच्या डोंगराला अतिवृष्टीमुळे सुमारे दोनशे ते अडीचशे फुटाची भेग पडली. त्यातून डोंगर खचून भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या तीन कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. काही दिवसांपासून ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भातशेतीसह शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील जमिनींना तडे जाऊन भूस्खलन होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भूस्खलनाच्या भीतीने डोंगरपायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या तीन कुटुंबांचे संभाव्य धोका टाळण्यासाठी स्थलांतर केले आहे. 

 दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम भागातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या वेळी पाटील म्हणाले,‘‘ कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी मदतीविना वंचित राहता कामा नये. त्यासाठी तातडीने पंचनामे करा,’’ या भागात अजूनही पाऊस सुरू आहे. शेकडो शेतकऱ्यांची भात शेती वाहून गेली आहे. पोखरी घाटात दरडी पडल्याने भीमाशंकरपर्यंत संपर्क तुटला होता. प्रशासनाचे दरडी काढण्याचे काम चालू आहे. गोहे, मेघोली, कुशिरे, पाटण परिसरातील रस्त्यांवरही दरडी पडल्याने संपर्क तुटला आहे.

अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. आदिवासी भागात पावसाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वळसे पाटील यांनी शिनोली, फदालेवाडी, उगलेवाडी, डिंभे, गोहे बुद्रूक, गोहे खुर्द या भागाचा दौरा केला.  नुकसानग्रस्तांनी मदतीची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया
पावसाने वांद्रे, पिंपरी, भोरकस, वडुस्‍ते, अहिरवाडी परिसरातील शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसोबत शेतांचे बांधही वाहून गेले. काही लोक वर्षांनुवर्षे टाटा कंपनीची जमीन कसत आहेत. त्‍यांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे.
-प्रकाश ढमाले, वांद्रे (ता. खेड), शेतकरी 
 


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...