लोकसहभागातून मैराळडोह येथे पांदण रस्त्याचे काम..

वाशीम ः सध्या लॉकडाऊन सुरू असून या फावल्या वेळेत गावकऱ्यांनी चक्क शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून पांदण रस्त्याचे काम सुरू केले आहे. ग्रामपंचायतीचे सहकार्य आणि नागरिकांचा पुढाकार यातून तीन किलोमीटर अंतराचा रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा निश्‍चय नागरिकांनी केला आहे.
Pandan road work at Maraldoh through public participation

सन १९८२ पासून मैराळडोह येथील (आमराई) पांदण रस्ता पावसाळ्यात पाणी व चिखल होत असल्याने त्यावरून शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होऊन जाते. ही अडचण लक्षात घेत यंदा भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायत व सर्व शेतकऱ्यांच्या सहभागातून तीन किलोमीटर पांदणरस्त्याचे काम हातात घेण्यात आले आहे.

गावात चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी मैराळडोह ग्रामपंचायत प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. नागरिकांनी गावासाठी चांगले पांदणरस्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मैराळडोहच्या सरपंच राधाबाई बंडूराव घुगे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com