Agriculture news in Marathi Pandekrivi's state level cotton workshop tomorrow | Page 2 ||| Agrowon

‘पंदेकृवि’ची उद्या राज्यस्तरीय कापूस कार्यशाळा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

अकोला : लवकरच खरीप हंगाम येऊ घातला आहे. राज्याचा विचार करता विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या अतिशय महत्त्वाच्या नगदी पिकाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे राज्यस्तरीय ऑनलाइन कापूस कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (ता. २६) सकाळी ठीक १०.३० वाजता करण्यात आले आहे.

अकोला : लवकरच खरीप हंगाम येऊ घातला आहे. राज्याचा विचार करता विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या अतिशय महत्त्वाच्या नगदी पिकाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे राज्यस्तरीय ऑनलाइन कापूस कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (ता. २६) सकाळी ठीक १०.३० वाजता करण्यात आले आहे.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या कार्यशाळेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी)चे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा (परभणी)चे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राज्याचे आयुक्त कृषी डॉ. सुहास दिवसे, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग प्रामुख्याने सहभागी होणार आहेत.

यावेळी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. शरद गडाख (संचालक विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. देवराव देवसरकर (संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी), अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून कापूस विषयाचे तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्यासाठी एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर ऑनलाइन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. उपरोक्त नोंदणी केल्यानंतर इमेलवर लिंक प्राप्त होईल ज्याद्वारे कार्यशाळेत सहभागी होता येईल. या कार्यशाळेसाठी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी शास्त्रज्ञ विभाग प्रमुख सर्व कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विषयज्ज्ञ, कृषी विभागाचे सर्व संचालक, राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच कापूस उत्पादकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...