‘पंदेकृवि’कडून मेळघाटमधील आदिवासींना माती परीक्षणाचे धडे
‘पंदेकृवि’कडून मेळघाटमधील आदिवासींना माती परीक्षणाचे धडे

‘पंदेकृवि’कडून मेळघाटमधील आदिवासींना माती परीक्षणाचे धडे

अकोला ः अखिल भारतीय समन्वयीत दीर्घ मुदतीय खत संशोधन प्रकल्प आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आदिवासी उपयोजनेअंतर्गत मेळघाटमधील धारणी तालुक्यातील गोबरकहू या आदिवासी गावांत तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले.  गावामध्ये खरीप व रब्बी पिकांचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन या संबंधीची प्रात्यक्षिके, माती परीक्षण, पीक अवशेषांचा वापर करून कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी विषयांचे कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ज्वारी व सोयाबीन पिकांवर प्रत्येकी १५ असे ३० प्रात्याक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर देण्यात येत आहेत. धारणी तालुक्यातील गोबरकहू या गावात माती परीक्षण व खत व्यवस्थापनाबाबत नुकतेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दीर्घ मुदतीय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. डी. जाधव यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पीक उत्पादन कसे वाढविण्यात येईल, तसेच शाश्वत शेतीसाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. डी. व्ही. माळी यांनी प्रत्यक्ष मातीचा नमुना कसा घ्यावा व माती परीक्षण अहवाला नुसार खते देण्याबाबत तसेच डॉ. बी. ए. सोनुने यांनी सेंद्रिय खतांचे प्रकार व त्यांचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. ए. बी आगे यांनी खतांचे प्रकार व त्यांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मृद् विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. एम. भोयर यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील प्रमुख पाहुणे म्हणून लालजी तांडीलकर, दीपक बाबुलाल जावरकर, सोनाजी बाटु बेढेकर आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com