Agriculture news in marathi In the Pandharpur area, cutting the Drumastick Gardens | Agrowon

पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

करकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे. एकीकडे व्यापाऱ्यांनी शेती उत्पादनांकडे पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे वाहनचालकही धोका पत्करायला तयार नाहीत, याचा फटका करकंब परिसरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेवगा पिकांस ही बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क ऐन बहरात असणाऱ्या शेवगा पिकावर कोयता चालविला आहे. 

करकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच शेतीमालाचा उठाव कमी झाला आहे. एकीकडे व्यापाऱ्यांनी शेती उत्पादनांकडे पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे वाहनचालकही धोका पत्करायला तयार नाहीत, याचा फटका करकंब परिसरात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शेवगा पिकांस ही बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क ऐन बहरात असणाऱ्या शेवगा पिकावर कोयता चालविला आहे. 

पावसाळ्याच्या शेवटी सलग दीड महिना कमी अधिक प्रमाणात पडत राहिलेल्या पावसाचा मोठा फटका शेवगा पिकास बसला होता. रानात ओल टिकून राहिल्याने फुलेच निघाली नाहीत. जी निघाली त्यांची गळती झाली. त्यामुळे दोन महिने लांबलेला हंगाम सध्या बहरात आहे. पण ‘कोरोना’चे जागतिक संकट आल्याने वाहतूक व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेवग्याची विक्री होऊ शकत नाही. या भागातील शेवगा पंढरपूर, सोलापूर, पुणे, वाशी आदी ठिकाणी विक्रीसाठी जातो. येथील जास्त उत्पादन लक्षात घेऊन काही ठोक व्यापारीही जागेवरून माल विकत घेतात. 

पण सध्या ‘कोरोना’च्या धास्तीने शेतकऱ्यांपुढील उपरोक्त सर्व मार्ग बंद झाले आहेत. परिणामी झाडावरच शेंगा निब्बर होऊन नुकसान होऊ लागले आहे. डोळ्यादेखत होणारी हानी बघवत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी हातचा हंगाम सोडून छाटण्या चालू केल्या आहेत. तर काहीजण कुठे धावपळ करायची, कुणाच्या पाठीमागे लागायचं, असं म्हणत थेट शेवग्याला कोयता लावून ते काढूनच टाकत आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...