भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे निवडणूक रंगणार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीआता १९ जण रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान आवताडे असा थेट सामना रंगणार आहे.
भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे निवडणूक रंगणार
भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे निवडणूक रंगणार

सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांपैकी ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १९ जण रिंगणात आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान आवताडे असा थेट सामना रंगणार आहे. पण काही अपक्षांमुळे दोघांचीही डोकेदुखी वाढणार आहे. विशेष म्हणजे आवताडे यांना त्यांचेच चुलतबंधू सिद्धेश्‍वर आवताडे यांनी आव्हान दिले आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. त्यात महेंद्र काशिनाथ जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), नागेश अण्णासो भोसले (अपक्ष), मोहन नागनाथ हळणवर (अपक्ष), इलियास हाजीयुसूफ शेख (अपक्ष), संजय चरणू पाटील (अपक्ष), अमोल अभिमन्यू माने (अपक्ष), रामचंद्र नागनाथ सलगर (अपक्ष), मनोज गोविंदराव पुजारी (अपक्ष), बापू दादा मेटकरी (अपक्ष), अशोक ज्ञानदेव वाघमोडे (अपक्ष), रज्जाक ऊर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी (अपक्ष) या ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित १९ जणांमध्ये भालके, आवताडेंसह मात्र शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे, अपक्ष सिद्धेश्‍वर आवताडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपलाही फटका भाजपने समाधान आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्यातील मतांची विभागणी होऊ नये, यासाठी दोघांचा समेट घडवून आणला, पण ऐनवेळी आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्‍वर आवताडे यांनी उमेदवारी दाखल करून या सगळ्यावर पाणी फेरले. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः यात मध्यस्थी करत सिद्धेश्‍वर आणि त्यांचे वडील बबनराव आवताडे यांची समजूत काढली. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फटका भगीरथ भालके यांना बसू शकतो.

कल्याणरावांचे तळ्यात मळ्यात मूळचे काँग्रेसचे कल्याणराव काळे हे गतवर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपत गेले. पंढरपूर तालुक्यात मानणारा त्यांचाही एक वर्ग आहे. पण सध्या ते शांत आहात. भाजपत पण तिथे जाऊनही त्यांच्या साखर कारखान्यांना हवी ती मदत मिळाली नाही. आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही त्यांनी संपर्क केल्याचे बोलले जाते. पण अद्यापही त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. ....म्हणून आमची उमेदवारी महाविकास आघाडीशी सख्य असूनही या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील यांच्या रूपाने उमेदवार देत महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांची ऊसबिले थकली आहेत, शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत, हे सरकार आमच्या काही कामाचं नाही, वीजबिलासाठी आम्ही आंदोलने केली. पण दखल घेतली जात नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठीच आम्ही उमेदवारी दिली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंढरपुरात स्पष्ट केले. त्यामुळे निवडणुकीतील रंगत आणखीनच वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com