नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
ताज्या घडामोडी
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा कार्तिकी वारी प्रतीकात्मकरीत्याच साजरी झाली, त्यानंतर महाद्वार कालाही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून, या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे.
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा कार्तिकी वारी प्रतीकात्मकरीत्याच साजरी झाली, त्यानंतर महाद्वार कालाही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून, या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे.
परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात हांडी फोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाद्वार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा, अर्थात पादुका दिल्या होत्या अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोजक्याच भक्तांना प्रवेश देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेऊन मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहांडी फोडण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.
या महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता आता झाली आहे. या वारीनंतर आता श्री विठ्ठल मंदिर नियमअटींसह खुले करण्यात आले आहे. सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून श्रींचे ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली आहे.
- 1 of 1023
- ››