agriculture news in marathi Pandharpur, Kartiki Ekadashi, Shri Vitthal | Agrowon

महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा कार्तिकी वारी प्रतीकात्मकरीत्याच साजरी झाली, त्यानंतर महाद्वार कालाही मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून, या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे. 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात यंदा कार्तिकी वारी प्रतीकात्मकरीत्याच साजरी झाली, त्यानंतर महाद्वार कालाही मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असून, या काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता झाली आहे. 

परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात हांडी फोडण्यात आली. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून आषाढी व कार्तिकी वारीमध्ये महाद्वार काल्याचा सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. संत पांडुरंग महाराज यांना चारशे वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विठुरायाने आपल्या खडावा, अर्थात पादुका दिल्या होत्या अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मोजक्‍याच भक्तांना प्रवेश देऊन हा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर देवाच्या पादुका पागोट्याने बांधण्यात आल्या. यानंतर नामदास महाराज यांनी मदन महाराज यांना खांद्यावर घेऊन मंदिरातील सभामंडप येथे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून दहीहांडी फोडण्यात आली. यानंतर परंपरेप्रमाणे हा काला मार्गक्रमण करीत पुन्हा काल्याच्या वाड्यात दाखल झाला.

या महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता आता झाली आहे. या वारीनंतर आता श्री विठ्ठल मंदिर नियमअटींसह खुले करण्यात आले आहे. सध्या भाविकांना कोरोनाविषयक आरोग्याचे सर्व नियम पाळून श्रींचे ऑनलाइन बुकिंगनंतर मुखदर्शन देण्याची व्यवस्था समितीने केली आहे.


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...