पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची खरेदी

सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या केळीची खरेदी ढिगावर होत होती. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतील मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत होता.
In Pandharpur Market Committee Buy bananas by weight
In Pandharpur Market Committee Buy bananas by weight

सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या केळीची खरेदी ढिगावर होत होती. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांतील मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत होता. या रोषाची दखल घेत अखेरीस बाजार समितीने व्यापारी, शेतकरी, शेतकरी संघटनांची बैठक घेतली. केळीची खरेदी  वजनावर करण्याची सक्त ताकीद व्यापाऱ्यांना दिली. शुक्रवारपासून (ता.३०) तातडीने त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही व्यापाऱ्यांना दिली. 

बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. उपसभापती विवेक कचरे, सचिव कुमार घोडकेंसह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सभापती घाडगे यांनी व्यापाऱ्यांना याबाबत चांगलीच ताकीद दिली. कोणी व्यापारी त्यानुसार कार्यवाही करत नसेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करू, असेही ते म्हणाले. त्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनालाही लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी सूचना दिली. 

पंढरपूर बाजार समितीत डाळिंब, केळी, कांद्यासह भाजीपाला आणि फळांची मोठी आवक होते. त्यात केळीची खरेदी ही वर्षानुवर्षे ढिगावर केली जात होती. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळत होताच, पण बाजार समितीच्या कामावर आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. यापूर्वीही याबाबत तक्रार करून बाजार समितीने त्याची दखल घेतली नाही. मात्र, बाजार समितीच्या या भूमिकेबाबत समाज माध्यमांत मोठा रोष व्यक्त झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com