Agriculture news in Marathi Pandharpur should be made a district | Page 2 ||| Agrowon

पंढरपूरला जिल्हा करावा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याच्या मागणीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता. २९) चर्चा झाली.

सोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या पंढरपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याच्या मागणीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत गुरुवारी (ता. २९) चर्चा झाली. या सभेत पंढरपूर हा स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, असा ठराव करण्यात आला. त्यास सर्वच सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.  

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सभा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला कोळा (ता. सांगोला) येथील सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी केली. 

माळशिरस, पंढरपूरला स्वतंत्र प्रांत कार्यालय आहे. सेशन कोर्टही आहे. फक्त जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी येथील लोकांना सोलापूरला जावे लागते. सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर ये-जा करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. महसुली उत्पन्न सर्वाधिक या भागातून संकलित होते. पण विकासनिधी मिळताना दुय्यम स्थान मिळते. पंढरपूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यास विकास निधी मिळेल. त्यामुळे स्वतंत्र पंढरपूर जिल्ह्याची निर्मिती करावी, असा ठराव अॅड. देशमुख यांनी मांडला. त्यास सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. 

त्या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली. कोरवली (ता. मोहोळ) येथील आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाच्या विषयावरून या सभेत जोरदार चर्चा झाली. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सदस्या शैला गोडसे यांनी केली. कृषी सभापती अनिल मोटे, वसंतराव देशमुख, रजनी देशमुख, आनंद तानवडे या अन्य सदस्यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. याशिवाय आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या रखडलेल्या कामाविषयीही अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

सभेत यावर झाली चर्चा 

  • पंचायत समिती सभापतींच्या वाहनांना इंधनासाठी सेस फंडातून तरतूद करा. 
  • माळीनगर आरोग्य केंद्राला स्वतंत्र रुग्णवाहिका द्यावी
  • कोरोनाच्या काळात तीनशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या.
  • एनटीपीसीच्या पावणेदोन कोटीतून ‘दक्षिण’मध्ये डिजिटल शाळा, अखर्चित निधीचे पुनर्नियोजन करा.
  • सांगोला-पंढरपूर मार्गावरील वनक्षेत्रालगत रस्त्याचे काम मार्गी लावा.

इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...