पंढरपुरात चंद्रभागा नदी काठावरील घाटाची भिंत कोसळली

चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत बुधवारी (ता. १४) दुपारी कोसळली. यामध्ये पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांनी मदत कार्य सुरू केले आहे.
In Pandharpur, the wall of the ghat on the banks of Chandrabhaga river collapsed
In Pandharpur, the wall of the ghat on the banks of Chandrabhaga river collapsed

पंढरपूर, जि. सोलापूर : चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत बुधवारी (ता. १४) दुपारी कोसळली. यामध्ये पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांनी मदत कार्य सुरू केले आहे.

या दुर्घटनेचे माहिती समजताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले असून, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेची समजलेली माहिती अशी, की चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटालगत घाटाचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसातील पावसामुळे आज दुपारी अडीचच्या सुमारास तेथील भाग खचून भिंत कोसळली. त्यामध्ये पाच ते सहा जण अडकले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडचण येत आहे. रुग्णवाहिका तसेच नगरपालिकेचे अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. परंतु जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडचण येत आहे. रुग्णवाहिका तसेच नगरपालिकेचे अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com