Agriculture news in marathi Pandurang Sugar Factory Leading the way in the district | Agrowon

पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात जिल्ह्यात आघाडीवर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७ हजार लिटर बी-हेवी इथेनॉलचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ११.३० टक्के मिळवून कारखान्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७ हजार लिटर बी-हेवी इथेनॉलचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ११.३० टक्के मिळवून कारखान्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. उर्वरित संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. 

चालू गळीत हंगामात कारखान्यात उत्पादित ९ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. परिचारक म्हणाले, ‘‘पांडुरंग कारखान्याने गाळप हंगामाच्या केवळ १२४ दिवसांत ८ लाख ३१ हजार ६६७ टन उसाचे गाळप करून ९ लाख १ हजार १११ पोती साखर उत्पादित केली आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्यासह खातेप्रमुखांच्या नियोजनामुळे कमी कालावधीत एवढे मोठे गाळप झाले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत ५ कोटी ४२ लाख युनिट वीज तयार करून २ कोटी ८२ लाख युनिट वीज विक्री केली आहे.

आसवनी प्रकल्पामधून ६६ लाख लिटरचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे आणखी सुमारे २ लाख टन ऊस उपलब्ध आहे. कारखाना २५ मार्चपर्यंत चालवून उपलब्ध सर्व उसाचे गाळप करणार आहे.’’ वसंत देशमुख, संचालक दिनकर नाईकनवरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, सभापती जयश्री व्हरगर, उपसभापती विवेक कचरे यांच्यासह संचालक उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...