agriculture news in marathi, Panhala taluka in crop on hummani attack | Page 2 ||| Agrowon

पन्हाळा तालुक्यात पिकावर हुमणीचा उपद्रव

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील शिवारांमध्ये हुमणीचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. भात, ऊस, भुईमुगासोबतच भाजीपाला पिके हुमणीमुळे कोमेजू लागली आहेत.

जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस कमी झाल्यापासून हुमणी सर्वच पिकांमध्ये वाढली असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांची शेतातील सर्व पिकेच कोमेजल्याचे चित्र आहे. रासायनिक कीटकनाशके वापरूनही हुमणी आटोक्यात येत नाही.
उसाचा बुडखा हाताने अलगद उपडता येतो इतकी त्याची मुळे हुमणीने कुरतडली आहेत. तजेलदार पिके अचानक कोमेजलेली दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील शिवारांमध्ये हुमणीचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. भात, ऊस, भुईमुगासोबतच भाजीपाला पिके हुमणीमुळे कोमेजू लागली आहेत.

जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस कमी झाल्यापासून हुमणी सर्वच पिकांमध्ये वाढली असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांची शेतातील सर्व पिकेच कोमेजल्याचे चित्र आहे. रासायनिक कीटकनाशके वापरूनही हुमणी आटोक्यात येत नाही.
उसाचा बुडखा हाताने अलगद उपडता येतो इतकी त्याची मुळे हुमणीने कुरतडली आहेत. तजेलदार पिके अचानक कोमेजलेली दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यवलूज परिसरात कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. या वेळी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील प्रा. डाॅ. मोहनराव जाधव, ग्रामसेवक जयवंत पाटील, मोराजी पाटील, अमर मोरे, कृषिदूत पृथ्वीराज धुमाळ, शुभम भोसले, सौरभ आवळे, राहुल महारनवर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

पाऊस उघडल्यापासून हुमणीचा उपद्रव सगळ्याच पिकांमध्ये इतका वाढला आहे, की उसाचे पीक हाताला लागणार नाही असेच दिसते. ऊस उपटून जनावरांना खायला घालावा लागत आहे.
- पांडुरंग पाटील, यवलूज

हुमणीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येताच आम्ही आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर ‘इपीएन’ आणि मेटॅरायझियम अॅनिसोप्ली या जैविक कीटकनाशकांची प्रात्यक्षिके राबविण्यास सुरवात केली अाहे. केवळ रासायनिक उपायांमुळे हुमणी आटोक्यात येत नसल्याचे शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यामुळे एकात्मिक नियंत्रणाबाबत आवश्यकतेनुसार प्रात्यक्षिके, प्रशिक्षणे यांची व्याप्ती वाढवणार आहे.
- पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, पन्हाळा


इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...