नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषद

नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषद
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषद

नाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या बरोबरीने पाण्याचा योग्य वापरही महत्त्वाचा ठरतो. सततच्या दुष्काळामुळे पाणीटंचाईवर मात करून उपलब्ध पाण्यावर अधिक पिके घेणे काळाची गरज बनली आहे. जलसंधारणावर अनेकदा चर्चा होतात, मात्र जलव्यवस्थापनावर कुठेही विशेष चर्चा होताना दिसत नाही. हीच बाब ओळखून ‘सकाळ-ॲग्रोवन'ने यंदाचे वर्ष जलव्यवस्थापन वर्ष जाहीर केले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून नाशिक येथे आज (ता. २६) पाणी परिषदेचे आयोजन केले आहे.  शहरातील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत पाणी व्यवस्थापन परिषद होणार आहे. ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा.लि. व सपल अग्रोटेक प्रा.लि हे परिषदेचे प्रायोजक आहेत.  नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, भाजीपाला व इतर काही शेतकऱ्यांची मुख्य पिके आहेत. मात्र पाण्याची टंचाई असल्याने लागवडीखालील क्षेत्र घटते आहे. दुष्काळाचे गंभीर परिणाम अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले. यासाठी काळाची पावले ओळखून जमीन व पाणी व्यवस्थापनासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परिषदेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर व सोलापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे मार्गदर्शन करणार आहेत.  कार्यक्रमाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोशाध्यक्ष कैलास भोसले यांच्या हस्ते होणार आहे. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळ नाशिक आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पाणी व्यवस्थापन परिषद

  • केव्हा ः बुधवार, २६ जून २०१९ (सकाळी १०.३० ते १.३०)
  • कोठे ः कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक    
  • प्रवेश ः सर्वांना विनामूल्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com