agriculture news in Marathi, pani parishad in Nashik today, Maharashtra | Agrowon

नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

नाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या बरोबरीने पाण्याचा योग्य वापरही महत्त्वाचा ठरतो. सततच्या दुष्काळामुळे पाणीटंचाईवर मात करून उपलब्ध पाण्यावर अधिक पिके घेणे काळाची गरज बनली आहे. जलसंधारणावर अनेकदा चर्चा होतात, मात्र जलव्यवस्थापनावर कुठेही विशेष चर्चा होताना दिसत नाही. हीच बाब ओळखून ‘सकाळ-ॲग्रोवन'ने यंदाचे वर्ष जलव्यवस्थापन वर्ष जाहीर केले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून नाशिक येथे आज (ता. २६) पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. 

नाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या बरोबरीने पाण्याचा योग्य वापरही महत्त्वाचा ठरतो. सततच्या दुष्काळामुळे पाणीटंचाईवर मात करून उपलब्ध पाण्यावर अधिक पिके घेणे काळाची गरज बनली आहे. जलसंधारणावर अनेकदा चर्चा होतात, मात्र जलव्यवस्थापनावर कुठेही विशेष चर्चा होताना दिसत नाही. हीच बाब ओळखून ‘सकाळ-ॲग्रोवन'ने यंदाचे वर्ष जलव्यवस्थापन वर्ष जाहीर केले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून नाशिक येथे आज (ता. २६) पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. 

शहरातील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत पाणी व्यवस्थापन परिषद होणार आहे. ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा.लि. व सपल अग्रोटेक प्रा.लि हे परिषदेचे प्रायोजक आहेत. 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, भाजीपाला व इतर काही शेतकऱ्यांची मुख्य पिके आहेत. मात्र पाण्याची टंचाई असल्याने लागवडीखालील क्षेत्र घटते आहे. दुष्काळाचे गंभीर परिणाम अनेक शेतकऱ्यांनी अनुभवले. यासाठी काळाची पावले ओळखून जमीन व पाणी व्यवस्थापनासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परिषदेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर व सोलापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि महा ऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे मार्गदर्शन करणार आहेत. 

कार्यक्रमाचे उद्‍घाटन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोशाध्यक्ष कैलास भोसले यांच्या हस्ते होणार आहे. ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळ नाशिक आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पाणी व्यवस्थापन परिषद

  • केव्हा ः बुधवार, २६ जून २०१९ (सकाळी १०.३० ते १.३०)
  • कोठे ः कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक    
  • प्रवेश ः सर्वांना विनामूल्य

इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...