Agriculture news in marathi Panic in the countryside due to fears of leopard | Agrowon

बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा बिबट दिसल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, असा ठराव शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने घेतला.

अमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा बिबट दिसल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत. त्यामुळे या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, असा ठराव शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने घेतला.

धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील गव्हा फरकाडे, शेंदूरजना खुर्द सह परिसरातील अनेक गावांमध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आठवडाभरात दोनदा बिबट्या दिसल्याने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शेतीकामे प्रभावित झाली आहेत. सध्या शेतात रब्बी पिके असून वीज वितरण कंपनीकडून रात्रीच्यावेळी वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलीत करण्यासाठी रात्री, बेरात्री शेतशिवार गाठावे लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे हे कामही प्रभावित झाले असून रब्बी पिके धोक्‍यात आली आहेत. 

या प्रकाराची गंभीर दखल घेत शेंदूरजना खुर्द ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभेचे आयोजन केले. या सभेत दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला वनविभागाने तत्काळ जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे, असा ठराव घेत तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वनविभागाने देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावले उचलत परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. त्यासोबतच वनविभागाने चार वनरक्षकांची नेमणूकही त्या भागात केली आहे. शेतात जातांना चार ते पाचच्या संख्येत जाण्याचा सल्ला वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...