‘पंदेकृवि’चा वोल्काईट विश्वविद्यालयासोबत करार

करार
करार

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत ‘पंदेकृवि’ व इथिअोपिया येथील वोल्काईट विश्वविद्यालयादरम्यान शैक्षणिक करार झाला. या करारामुळे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इथिओपियाच्या शैक्षणिक संसाधनांचा उपयोग व तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार आहे. शैक्षणिक मूल्यांकन तसेच विविध तंत्रज्ञानाकरिता झालेल्या या सामंजस्य करारावेळी वोल्काईट विश्वविद्यालयातर्फे सुशील सक्कलकार यांची उपस्थिती होती. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, नियंत्रक विद्या पवार, डॉ. नितीनकुमार राऊत यांची उपस्थिती होती. वोल्काईट विश्वविद्यालयात सात महाविद्यालये असून, दीड हजार विद्यार्थी क्षमता असलेले ४६ स्नातकोत्तर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सामंजस्य करारानंतर दोन्ही विद्यापीठांतील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या विद्यापीठातील कृषी शिक्षणविषयक सोयीसुविधा संसाधनाचा उपयोग करता येईल व समाजाकरिता आवश्यक तंत्रज्ञान निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांनी या करारानंतर कृषी शिक्षणाशी संबंधित सर्वच विषय लक्षात घ्यावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. भाले यांनी या वेळी केले. डॉ. प्रदीप बोरकर यांनी अाभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com