जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी पार्कात ः पंकजा मुंडे

जानकर साहेबांची ताकत चौकात  नाही; शिवाजी पार्कात ः पंकजा मुंडे
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी पार्कात ः पंकजा मुंडे

मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत वाढत असून ‘रासप’ वटवृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महादेव जानकर साहेबांची ताकत चौकात नसून, शिवाजी पार्कापर्यंत पोचली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.  राष्ट्रीय समाज पक्षाचा १६वा वर्धापन दिन दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर झाला. त्या वेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राहुल कुल, प्रवीण दरेकर, बाळासाहेब दोडतले, अभिनेत्री सपना बेदी, चित्रपट निर्माते अजय अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘रासपची राज्यात ताकत वाढली आहे. रासपचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. नगरपालिका, बाजार समितीवर रासपचे वर्चस्व असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रासपचा योग्य जागा देऊन सन्मान केला जाईल. आधीच्या सरकारने राज्याला लुटण्याचे काम केले. धनगर समाजाची फसवणूक केली. जातीपातीत तेढ निर्माण करून सत्ता भोगली. त्यांची ही चाल सर्वसामान्य जनतेने २०१४ सालीच ओळखली. येणाऱ्या निवडणुकीतदेखील सर्वसामान्य जनता भाजप, शिवसेना, रासप आणि रिपाइं (ए) या महायुतीसोबत राहणार आहे.’’   महादेव जानकर म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची १५ वर्षे राज्यात सत्ता होती. या पक्षांनी इतर मागासवर्ग, दलित, आदिवासी आदी समाजावर अन्याय अत्याचार केले. धनगर समाजाच्या आरक्षणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे.  राष्ट्रीय समाज पक्ष २७ राज्यांत पसरला असून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत ‘रासप’ला पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या ताकदीचा विचार करून आम्हाला जागा द्या; तसेच आमच्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचे घोषित केले.  संजय दत्त करणार ‘रासप’चा प्रचार  राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला अभिनेता संजय दत्त यांनी व्हिडिओवरून शुभेच्छा दिल्या; तसेच रासपच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले.  ‘रासप’ची भाजपकडे ५७ जागांची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाची राज्यात ताकद वाढली आहे. पक्षाचे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. अनेक नगरपालिका, बाजार समित्या ‘रासप’च्या ताब्यात आहेत. पक्षाच्या ताकदीचा विचार करूनच भाजपकडे ५७ जागांची मागणी केल्याचे महादेव जानकर यांनी उपस्थित जनसमुदायस सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com