agriculture news in marathi, Papai arrivals in the new season in Khandesh | Agrowon

खानदेशात नव्या हंगामातील पपईची आवक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पपईची काढणी अपेक्षितपणे सुरू झालेली नाही. मागील वर्षी दसरा सणानंतर तोडे वेगात सुरू झाले होते. १५ रुपये किलोचा दर मिळाला होता. यंदा आमच्या भागात पीक हवे तसे जोमात नाही. त्यामुळे पुढे पुरवठा कमी राहू शकतो.
- नरेंद्र पाटील, पपई उत्पादक, लोणी

जळगाव : नव्या हंगामातील दर्जेदार पपईची आवक सुरू झाली आहे. ती कमी असली तरी सुरवातीच्या दरांचा काहीसा लाभ अर्ली लागवड केलेल्या शेतकऱ्यांना होत असून, दर्जेदार फळांना किमान १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. सध्या आवक शहादा (जि. नंदुरबार), तळोदा व शिरपूर भागातून सुरू आहे. चोपडा तालुक्‍यातही काही शेतकऱ्यांच्या शेतात पपईचे तोडे झाल्याची माहिती मिळाली.

पपईची काढणी किरकोळ स्वरूपात आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार, तळोदा, नागपुरात सुमारे दीड हजार हेक्‍टर, धुळे जिल्ह्यात धुळे, शिरपुरात सुमारे ५०० हेक्‍टर, जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा, जळगाव, पाचोरा व जामनेर भागात मिळून एक हजार हेक्‍टरवर पपईचे पीक आहे. पावसाच्या भीतीने शेतकरी सुरवातीचे तोडे करून घेत आहेत. नंदुरबार भागात कमी, तर धुळ्यात काही भागात पुरवठा सुरू आहे. दसऱ्यानंतर तो वाढण्याचा अंदाज आहे.

दर्जेदार पपईच्या खरेदीसाठी
राजस्थान, मध्य प्रदेशातील खरेदीदार येत आहेत. काही व्यापाऱ्यांनी पपईच्या बागांची पाहणी करून आगाऊ नोंदणी केली आहे. सध्या थेट शेतात १५ रुपये, तर बाजार समितीत कमी दर्जाच्या फळांना १० ते १५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. जळगाव बाजार समितीत मागील दोन दिवसांपासून प्रतिदिन सात क्विंटल पपईची आवक झाली.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...