नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने विक्री

नंदुरबार: लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. तब्बल चार रुपये प्रतिकिलोप्रमाणे पपईची विक्री करवी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
Papai's Sale at a bargain price in Nandurbar district
Papai's Sale at a bargain price in Nandurbar district

नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. तब्बल चार रुपये प्रतिकिलोप्रमाणे पपईची विक्री करवी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, प्रशासन याबाबत कार्यवाही करायला तयार नसल्याची स्थिती आहे. 

वाहतुकीच्या अडचणीबाबत तोडगाही निघाला. शेतीमाल वाहतुकीसाठी रितसर परवाना घेऊन वाहतुकीस परवानगी प्रशासनाने दिली आहे. परंतु, या स्थितीचा गैरफायदा खरेदीदार, व्यापारी घेत आहेत. ते शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पपईची खरेदी चार रुपये प्रतिकिलो दरात सुरू आहे.

उधारीने पपईची विक्री करावी लागत आहे. जिल्ह्यात तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धुळ्यातील शिरपूर भागात पपईचे पीक जोमात आहे. मार्चच्या सुरवातीपर्यंत दर १० रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. परंतु, लॉकडाऊन सुरू होताच दर घसरले. आता तर खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. 

धुळे, नंदुरबारमध्ये रोज १० ते १२ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) पपईची आवक सुरू आहे. पपई नाशवंत आहे. तिची काढणी वेळेत व्हायला हवी. अन्यथा, झाडावरच पिकून तिचे नुकसान होते. यंदा उशिराने लागवड झाल्याने फळ धारणाही उशीराच झाली. उशिराच्या बागा जोमात आहेत. त्यात दर्जेदार फळे काढणीला येत आहेत. 

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना 

खरेदीदार व्यापारी राजस्थान, दिल्ली व इतर भागात पपईची विक्री सोळा ते सतरा रुपये प्रतिकिलो दरात करीत आहेत. परराज्यातील बाजारपेठेत पपई पोचविण्यासाठी सहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे खर्च येत असल्याचे खरेदीदारांकडून सांगितले जाते. मात्र, चार रुपये प्रतिकिलोचा दर परवडत नसल्याचे शेतकरी रोहित पटेल (शहादा) यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com