परभणीत पपई सरासरी ९०० रूपये क्विंटल

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३०) पपईची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल १२०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला.
papaya averages Rs. 900 per quintal in Parbhani
papaya averages Rs. 900 per quintal in Parbhani

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.३०) पपईची ४० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान ६०० ते कमाल १२०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन १२०० ते २०००, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले. शेपूची २० क्विंटल आवक होऊन १५०० ते २५००, सरासरी २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन २००० ते ३०००, तर सरासरी २५०० रुपये दर मिळाले.

मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये, तर सरासरी ६५० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १७५ क्विंटल आवक होऊन २००० ते ५००० रुपये, तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची १५ क्विंटल आवक होऊन ४००० ते ६००० रुपये, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक असताना ४००० ते ६००० रुपये, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल आवक होऊन ४००० ते ६५०० रुपये, तर सरासरी ५२५० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक होऊन ४००० ते ६००० रुपये, तर सरासरी ५००० रुपये  दर मिळाले.

कारल्याची १० क्विंटल आवक होऊन ३००० ते ५००० रुपये, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. काकडीची ३५ क्विंटल आवक होऊन १२०० ते २००० रुपये, तर सरासरी ११०० रुपये मिळाले.

दुधी भोपळ्याची १५  क्विंटलला आवक होऊन १५०० ते ३००० रुपये, तर सरासरी २२५० रुपये मिळाले. काशिफळांची १५ क्विंटल आवक होऊन ७०० ते १२०० रुपये, तर सरसरी ९५० दर मिळाले. वांग्याची २५ क्विंटल आवक होऊन ३०००ते ५००० रुपये, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला २०० ते ५०० रुपये, तर सरासरी ३५० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची ५० क्विंटल आवक झाली. दर २५०० ते ५००० रुपये, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले. 

भुईमूग शेंगा ५००० रुपये क्विंटल

पातीच्या कांद्यांची ७ क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २५००, तर सरासरी २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगाची १५ क्विंटल आवक होऊन ४००० ते ६०००, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले. लिंबांची ४० क्विंटल आवक होऊन ७०० ते १५०० रुपये, सरासरी ११०० रुपये दर मिळाले. मक्याची २५क्विंटल आवक होऊन १२०० ते २५००, तर सरासरी १३५० रुपये दर मिळाले. आवळ्याची २५ क्विंटल आवक होऊन १००० ते २०००, तर सरासरी  १५०० रुपये दर मिळाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com