पपई उत्पादकांना खर्चही निघेना

यंदाच्या हंगामात पपई उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीवर केलेला खर्चही निघू शकलेला नाही. अनेकांनी बागा जमीनदोस्त करीत दुसऱ्या पिकांची तयारी सुरू केली आहे.
पपई उत्पादकांना खर्चही निघेना Papaya growers did not even get the product
पपई उत्पादकांना खर्चही निघेना Papaya growers did not even get the product

अकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे वळू लागले असतानाच नैसर्गिक संकट, कीड रोगांमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या हंगामात पपई उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीवर केलेला खर्चही निघू शकलेला नाही. अनेकांनी बागा जमीनदोस्त करीत दुसऱ्या पिकांची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या हंगामात लागवड केलेले पपईचे बहुतांश पीक शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक बनले आहे.लागवडीनंतर काही दिवस जात नाहीत तो सलग पाऊस झाला. परिणामी झाडांचे नुकसान झाले. झाडांवरील पाने गळून पडली, फळधारणाही पुरेशा संख्येने झाली नाही. काही बागांना व्हायरसने फटका दिला. एकीकडे पाऊस व दुसरीकडे कीडरोगांचा प्रादुर्भाव, यातच पपईचा हंगाम हातातून गेला. सन २००८ पासून लागवड करीत असलेले मानोली (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील संतोष भगवंतराव महाकाळ यांनी सांगितले, यंदा सलग पावसामुळे त्यांच्या २ हजार ५०० झाडांचे नुकसान झाले. यासाठी दीड लाखांपर्यंत खर्चही केला. परंतु अतिपावसामुळे बाग टिकली नाही. नुकतीच ही बाग उखडून फेकली आहे. एकही रुपया यातून मिळाला नाही. पावसामुळे झाडांवर पानेच राहिली नव्हती. लागवड केल्यानंतर मार्च ते जूनपर्यंत दोन रखवालदार ठेवत वन्यजीवांपासून बागेचे संरक्षण करावे लागले. जूनपासून सलग पाऊस पडल्याने हे पीक यंदा सावरलेच नाही. निंभारा येथे गणेशराव नानोटे यांनी चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या बागांचीही अशीच स्थिती झाली. या बागेसाठी त्यांनी अडीच लाख रुपये खर्च केला होता. परंतु आतापर्यंत हातात एकही रुपया आलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com