Agriculture news in marathi Papaya growers did not even get the product | Page 2 ||| Agrowon

पपई उत्पादकांना खर्चही निघेना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

 यंदाच्या हंगामात पपई उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीवर केलेला खर्चही निघू शकलेला नाही. अनेकांनी बागा जमीनदोस्त करीत दुसऱ्या पिकांची तयारी सुरू केली आहे.
 

अकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी नवनवीन फळ पिकांकडे वळू लागले असतानाच नैसर्गिक संकट, कीड रोगांमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या हंगामात पपई उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीवर केलेला खर्चही निघू शकलेला नाही. अनेकांनी बागा जमीनदोस्त करीत दुसऱ्या पिकांची तयारी सुरू केली आहे.

यंदाच्या हंगामात लागवड केलेले पपईचे बहुतांश पीक शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक बनले आहे.लागवडीनंतर काही दिवस जात नाहीत तो सलग पाऊस झाला. परिणामी झाडांचे नुकसान झाले. झाडांवरील पाने गळून पडली, फळधारणाही पुरेशा संख्येने झाली नाही. काही बागांना व्हायरसने फटका दिला. एकीकडे पाऊस व दुसरीकडे कीडरोगांचा प्रादुर्भाव, यातच पपईचा हंगाम हातातून गेला.

सन २००८ पासून लागवड करीत असलेले मानोली (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील संतोष भगवंतराव महाकाळ यांनी सांगितले, यंदा सलग पावसामुळे त्यांच्या २ हजार ५०० झाडांचे नुकसान झाले. यासाठी दीड लाखांपर्यंत खर्चही केला. परंतु अतिपावसामुळे बाग टिकली नाही. नुकतीच ही बाग उखडून फेकली आहे. एकही रुपया यातून मिळाला नाही. पावसामुळे झाडांवर पानेच राहिली नव्हती. लागवड केल्यानंतर मार्च ते जूनपर्यंत दोन रखवालदार ठेवत वन्यजीवांपासून बागेचे संरक्षण करावे लागले.

जूनपासून सलग पाऊस पडल्याने हे पीक यंदा सावरलेच नाही. निंभारा येथे गणेशराव नानोटे यांनी चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या बागांचीही अशीच स्थिती झाली. या बागेसाठी त्यांनी अडीच लाख रुपये खर्च केला होता. परंतु आतापर्यंत हातात एकही रुपया आलेला नाही.


इतर ताज्या घडामोडी
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...
आसामच्या चहाचे चाहते!भर्रर्रऽऽ असा भिंगरीगत आवाज करत वारा हेल्मेटच्या...
शाश्‍वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतीग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-...