नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी यांच्यात नुकतीच शहादा (जि. नंदुरबार) येथे बैठक झाली. ती निष्फळ ठरली असून, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला सव्वासहा रुपये प्रतिकिलोचा दर देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे दरप्रश्नी तोडगा न निघाल्याने गुरुवारपासून (ता. १७) नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील पपई काढणी बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. 

पपई दराबाबतचा तिढा मागील दोन महिन्यांपासून कायम आहे. ऑक्‍टोबरमध्ये पपईला १६ रुपये प्रतिकिलो, असे दर शेतकऱ्यांना जागेवरच मिळत होते. परंतु नोव्हेंबरअखेरपर्यंत दर चार रुपये प्रतिकिलो झाले. डिसेंबरमध्येही दर तीन ते चार रुपयेच दर देण्यात आले. मध्यंतरी सव्वाआठ रुपये प्रतिकिलो असे दर शेतकऱ्यांनी मागितले होते. परंतु हे दर देण्यास व्यापाऱ्यांनी एकी करून नकार दिल्याने शेतकऱ्यांचे डिसेंबर महिन्यात मोठे नुकसान झाल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.

दरांचा वाद मिटविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी यांची एक समिती शहादा येथील तहसीलदार यांच्या आदेशानुसार स्थापन झाली आहे. या समितीची बैठक शहादा येथील बाजार समितीत झाली. यात बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष घनश्याम चौधरी, बाजार समितीचे सचिव संजय पाटील व पपईचे व्यापारी, खरेदीदार उपस्थित होते.

या बैठकीत बाजार समितीने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सव्वासहा रुपये प्रतिकिलोचा दर मागितला. परंतु व्यापाऱ्यांनी एवढा दर देणे शक्‍य नसल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांनी पाच रुपये २१ पैसे दर देण्याची तयारी दाखविली. परंतु बाजार समितीने शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता पाच रुपये २१ पैसे दरास नकार दिला. सव्वासहा रुपये दर मिळाला तरच पपईची काढणी करावी, अन्यथा काढणी बंद राहील, असा निर्णय या बैठकीत झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com