agriculture news in marathi Papaya prices rise sharply in Khandesh | Agrowon

खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढा

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

जळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले आहे. काढणीला वेग येताच, दर पाडण्याचे प्रकार खरेदीदार करीत आहेत.

जळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले आहे. काढणीला वेग येताच, दर पाडण्याचे प्रकार खरेदीदार करीत आहेत. दरात मोठी घसरण गेल्या काही दिवसांत झाली आहे. परंतु, यामुळे पपई उत्पादक संकटात सापडले आहेत. किमान सव्वासात रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा शिवार खरेदीत मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

दरांबाबतचा तिढा या महिन्याच्या सुरवातीलाही तयार झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी दर सहा रुपये प्रतिकिलो, असे झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी तक्रार केली. पपईसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार प्रसिद्ध आहे. या भागात काही शेतकरी गटांनी पपई काढणी सहा रुपये प्रतिकिलो दरात करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यामुळे शेतकरी पपईची काढणी न करण्याच्या तयारीत आहेत. 

पपईची खरेदी स्थानिक एजंटच्या मदतीने राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील खरेदीदार करतात. सध्या शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागात पपईची काढणी सुरू आहे. सध्या रोज ३५ ट्रक (एक ट्रक १० टन क्षमता) एवढी पपईची आवक सुरू आहे. आवक वाढत असतानाच दर कमी झाले. सुरवातीला प्रतिकिलो १८ रुपये दर जागेवर मिळत होता. नंतर दरात घसरण होऊन १२ रुपये प्रतिकिलोचा दर झाला. 

सध्या सहा रुपये  प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यामुळे पपई उत्पादकांना फटका बसत आहे. पीक परवडत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पपई उत्पादकांनी काढणी बंद करून दरवाढीची मागणी केली आहे. यासंदर्भात लवकरच शहादा, तळोदा, शिरपूर येथे बाजार समित्या, सहायक उपनिबंधक यांच्याकडे शेतकरी जाऊन तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. या स्थितीमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून कार्यवाही करावी, अशी मागणी केली.


इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...