agriculture news in marathi papaya rate down in Khandesh | Agrowon

पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात पपईचे दर निम्म्यावर आले आहेत. कमी दराचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, प्रतिकिलो सहा रुपये दर मिळत आहे. 

जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात पपईचे दर निम्म्यावर आले आहेत. कमी दराचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून, प्रतिकिलो सहा रुपये दर मिळत आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरवातीला प्रतिकिलो १८ रुपये दर थेट शिवार खरेदीत मिळत होता. तर हंगाम अखेरपर्यंत प्रतिकिलो चार रुपये दर होता. अतिपावसात मागील हंगामात पिकाला फटका बसला होता. यंदाही पीक अतिपावसात हातचे गेले आहे. परंतु दर सुरवातीपासून कमी आहेत. प्रारंभी प्रतिकिलो १६ रुपये दर जागेवर शेतकऱ्यांना मिळत होता. नंतर दर १२ रुपये प्रतिकिलो, असे झाले. तर सध्या सहा रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळत असून, शेतकऱ्यांची खरेदीदारांनी कोंडी केली आहे. आवक वाढल्याचे कारण खरेदीदार देत आहेत. 

धुळे, मध्य प्रदेश, राजस्थान येथील खरेदीदार पपई खरेदीसाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जामनेर, धुळ्यात शिरपूर व शिंदखेडा आणि नंदुरबारात शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्यात पपईचे पीक आहे. एकट्या शहादा तालुक्यात सुमारे ३८०० हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे. यंदा लागवड काहीशी वाढली आहे. परंतु अतिपाऊस व विषाणूजन्य रोगांमुळे पिकाचे सुरवातीपासून नुकसान झाले. जळगाव, चोपडा भागात तर काही शेतकऱ्यांना हंगाम हाती येण्यापूर्वीच पीक मोडावे लागले. 

बैठक घेण्याची शेतकऱ्यांची मागणी 
पपईची ९५ टक्के खरेदी थेट शिवारात किंवा जागेवर केली जाते. खरेदीदार मनमानी करीत आहेत. परंतु त्याबाबत कुठेही बाजार समित्या, प्रशासनाने कारवाई केलेली नाही. किमान उत्पादन खर्च व किरकोळ बाजाराचा आढावा घेऊन दर निश्‍चित करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. शहादा तालुक्यात शेतकरी व काही बाजार समितीच्या संचालकांनी मध्यंतरी कमी दरात खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाका व विक्री बंद करा, अशी भूमिका घेतली होती. या समस्येबाबत जिल्हा प्रशासनाने एक भूमिका घेऊन बैठक घेण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. 


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाला आवक घटली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
राज्यात बटाटा १००० ते २६०० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १००० ते १२५० रुपये...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात सुधारणानाशिक: नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
नगरमध्ये तूर ४००० ते ५५०० रुपये...नगर ः नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात कांदा दरात सुधारणा सुरूच आहे. दर...
औरंगाबादमध्ये मक्यासह तुरीचे दर स्थिरजालना : येथील बाजार समितीमध्ये गत आठवड्यात ५ ते ९...
पुण्यात भोगीनिमित्त गाजर, मटारला मागणीपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत द्राक्षांना क्विंटलला ६०००...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ९...
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
आंबिया संत्र्याला मिळाला २२ हजार...नागपूर : बाजारात संत्र्याचे दर गडगडले असतानाच...
राज्यात कांदा २०० ते ३५०० रुपयेसोलापुरात प्रतिक्विंटला २०० ते ३५०० रुपये...
नाशिकमध्ये दोडक्याची आवक सर्वसाधारण;...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
खानदेशात मक्याची आवक कमीजळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
जळगावात आले प्रतिक्विंटल ३००० ते ५०००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नागपुरात संत्रा, मोसंबीचे दर ‘जैसे थे’नागपूर : मागणीअभावी  संत्रा दरात घसरण झाली...
नगरला वाल, घेवड्याच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...