Agriculture news in marathi Papaya rates floting again in Nandurbar | Agrowon

पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

शहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने पपईला १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर देणे परवडत नसल्याचे कारण खरेदीदार व व्यापाऱ्यांनी पुढे केले आहे. यासंदर्भात खरेदीदारांच्या मागणीनुसार नुकतीच पपई उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात बैठक बोलावली. त्यात खरेदीदारांनी प्रतिकिलो ११.५५ रुपये प्रतिकिलो दर देऊ, अशी भूमिका घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी नकार दिल्याने ही बैठक अनिर्णित राहिली. 

शहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने पपईला १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर देणे परवडत नसल्याचे कारण खरेदीदार व व्यापाऱ्यांनी पुढे केले आहे. यासंदर्भात खरेदीदारांच्या मागणीनुसार नुकतीच पपई उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात बैठक बोलावली. त्यात खरेदीदारांनी प्रतिकिलो ११.५५ रुपये प्रतिकिलो दर देऊ, अशी भूमिका घेतली. परंतु, शेतकऱ्यांनी नकार दिल्याने ही बैठक अनिर्णित राहिली. 

पपईचा दर  १४ रुपये ५५ पैसे असा ठरला होता. त्याच दराने शेतकऱ्यांनी पपईची जागेवर किंवा शिवार खरेदीत विक्री करावी यापेक्षा कमी दराने पपईची विक्री करू नये, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी वाढवलेला पपईचा दर व्यापाऱ्यांना मंजूर नाही. यामुळे व्यापारी, खरेदीदार एकजूट करून दर पाडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

यासंदर्भातील बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात घेण्यात आली. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, विशाल पाटील, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते.

पपईला सध्या १४.५५ हा दर मिळत आहे. तो कमी करण्यासंदर्भात व्यापारी पुढे सरसावल्याने व्यापारी व संघर्ष समितीत दीर्घकाळ चर्चा चालली. पपई उत्पादक संघर्ष समितीने दर कमी होणार नाही, असे म्हटले आहे. पण, व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये दर घसरल्याने पूर्वीचा दर परवडत नसल्याचे सांगितले. बाजार समितीने व्यापाऱ्यांची समजूत घातली, परंतु व्यापाऱ्यांनी ११.५५ पैसे दर देऊ, अशी भूमिका कायम ठेवली. यामुळे बैठक निष्फळ ठरली. 

खरेदीदार सुरुवातीपासून कमी दरांबाबत आग्रही आहेत. ते शेतकऱ्यांची कोंडी करीत आहेत. बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या हातात गेल्याने शेतकऱ्यांची मागणी खरेदीदार मान्यच करीत नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक अनेक वर्षे सुरू आहे. ती बंद करावी, अशी मागणी पपई उत्पादक संघर्ष समितीने 
केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात वळीव पावसाचा दणका सुरूच पुणे : राज्यातील पुणे, नगर, जालना, यवतमाळ,...
गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली...नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर...
मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढमुंबई  : राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता...
अंकुशनगर परिसरात पावसाचा दणका अंकूशनगर, जि. जालना: एकिकडे कोरोनाचे सावट...
परराज्यातील कामगार, कष्टकऱ्यांची पूर्ण...मुंबई : जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची कमी नाही,...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
देशातील रुग्णसंख्या ९०० च्या घरातनवी दिल्ली : महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगात...
मुंबई बाजार समितीत आज व्यापाऱ्यांचा...मुंबई : राज्य शासनाच्या आदेशामुळे सुरू...
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार...अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
वऱ्हाडातील ६५ हजारांवर नागरिक गावी परतलेअकोला ः रोजगार, नोकरीच्या निमित्ताने शहरांमध्ये...
अकोल्यातील दिड हजारांवर शेतकऱ्यांची...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार...नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
नगर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी पावसाचा...नगर  ः नगर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी...
शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने...नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात पाऊस औरंगाबाद/जालना: दोन्ही जिल्ह्यातील जवळपास ६७...
कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना फटकासोलापूर ः खास उन्हाळी हंगाम डोळ्यासमोर ठेवून...
राज्य तलाठी संघांकडून एक दिवसाचे वेतन...परभणी ः कोरोना बाधितांच्या मदतीसाठी तलाठी, मंडल...
नांदेड येथे वाहतूक प्रमाणपत्र कक्ष...नांदेड ः अत्यावश्यक सेवा, वस्तू यांचा पुरवठा...
सांगली, मिरज, कुपवाड शहरात घरपोच...सांगली ः महापालिकेतर्फे सांगली, मिरज आणि कुपवाड...
नगर जिल्ह्यात लाख मोलाची फुले होताहेत...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परराज्यातील...