Agriculture news in marathi Papaya Rs 14.55 per kg | Agrowon

पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांच्यात पपई दरावरून सुरू असलेला वाद अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीने मिटला आहे. पपईला शिवार खरेदीत किंवा जागेवरच १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. यामुळे पपईची काढणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांच्यात पपई दरावरून सुरू असलेला वाद अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्यस्थीने मिटला आहे. पपईला शिवार खरेदीत किंवा जागेवरच १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. यामुळे पपईची काढणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. 

पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व बाजार समितीने पपई दरवाढीसाठी बोलावलेल्या बैठकीला व्यापाऱ्यांनी एकजुटीने विरोध दर्शविला होता. त्यांनी दरवाढीला अर्ज सादर करून विरोध दर्शविला होता. त्यावर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बाजार समितीने पुढाकार घेत पुन्हा बैठक घेतली त्यात १४.५५ रुपये प्रतिकिलोचा दर ठरवण्यात आला. यानंतर काढणी सुरू झाली. 

बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय चौधरी, रवींद्र रावल, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश पाटील, राजू पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील, राजू पिंजारी, जयप्रकाश पाटील, हिलाल माळी, भरत पाटील आदींसह शेतकरी व शेख हाजी नाजिम, हाजी सरताज, हाजी इक्‍बाल, प्रकाशभाई राजस्थान वाले, राहुलभाई राजस्थान वाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदी व्यापारी उपस्थित होते. 

दरवाढीसंदर्भात व्यापारी व संघर्ष समितीत दीर्घकाळ चर्चा चालली. पपई उत्पादक संघर्ष समितीने सुरुवातीला व्यापाऱ्यांशी चर्चा करताना १६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी केली. यानंतर सभापती पाटील, सचिव संजय चौधरी यांनी हस्तक्षेप करत व्यापाऱ्यांना तिढा सोडवण्यास सांगितला. यातच काही शेतकऱ्यांनी पपईला प्रतिकिलो १६ रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तूर्त खरेदी वेगात सुरू असल्याचे सांगण्यात आले. 


इतर बाजारभाव बातम्या
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ६८७५...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळी...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...